मुंबई - बॉलिवूडचा बॅड बॉय म्हणून ओळखला जाणाऱ्या
सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. सलमानला शिक्षा सुनवणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे हे मुळचे नागपूरचे असून त्यांची 2012 रोजी मुंबई येथे दिवाणी आणि सत्र न्यायालयात न्यायाधीक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
2014 पासून सीबीआयचे विषेश न्यायाधीश म्हणूनही ते काम पाहत आहेत. सत्र न्यायालयात नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी दादरचे अतिरिक्त दंडाधीकारी अशी जबाबदारीही बजावली. मुंबईत येण्याआधी त्यांनी अलिबागचे जिल्हा न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे.