आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पनवेल फॉर्महाऊसवर आज रात्री संपूर्ण कुटुंबियांसमवेत सलमान करणार सेलिब्रेशन !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमान खानच्या सेशन्स कोर्टाने सुनावलेल्या 5 वर्षाच्या शिक्षेला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर सल्लूच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. मुंबईतील काही भागात चाहत्यांनी एकमेंकांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली व फटाके वाजवून जल्लोष केला.
हायकोर्टाने सलमानच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने सलमान आगामी काही काळ निश्चितच तुरुंगाबाहेर राहणार आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील निर्मात्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' येत्या ईदला तर 'प्रेम रतन धन पाओ' दिवाळीत रिलीज होत आहे. हे दोन्हीही बिग बजेट चित्रपट वेळेत पूर्ण होतील असे सलमानच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे.
चाहत्यांच्या हातात साईबाबाचा फोटो-
सलमान खान या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडावा यासाठी सकाळपासूनच त्याचे चाहते पूजा-पाठ करीत आहेत. देशभर या पूजा-अर्चना सुरु आहेत. वाराणसीत (बनारस) सलमान खानच्या चाहत्यांनी आज सकाळी विशेष यज्ञ केला. मुंबई हायकोर्टाच्या बाहेर महाराष्ट्रातील काही चाहत्यांनी साईबाबाचा फोटो घेऊन गर्दी केली होती. सलमानच्या सुटकेसाठी ते साईबाबाला साकडे घालताना दिसत होते. सलमानची बहिण अर्पिता हिनेही सर्व काही आपण परमेश्वरावर सोडत आहोत असे सांगितले होते.
सलमानच्या घरी सेलिब्रेटीची रीघ-
दरम्यान, सलमान खानला मुंबई हायकोर्टाने दिलासा देताच सलमान खानच्या घरी सेलिब्रेटीची रांग लागली आहे. सलमानचा मित्र अभिनेता अजय देवगण, अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रेटी मंडळी सध्या सलमान खानच्या घरी आहेत. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर सलमान खानच्या घरीही आनंद व्यक्त करण्यात आला. घरी आलेल्या सर्व लोकांना कुटुंबियांनी मिठाई वाटून निर्णयाचे स्वागत केले. गुरुवारी आमिर खान, राज ठाकरे, नितेश राणे यांनी सलमानच्या घरी हजेरी लावली तर रात्री सुनील शेट्टी, ऋतिक रोशन यांनी सलमानची भेट घेतली. जूही चावला, वहिदा रहमान, करन जोहर, नगमा, गोविंदा, अमिषा पटेल, रविना टंडन, संगीता बिजलानी आणि सोनाक्षी सिन्हा यांनी सलमानच्या घरी यापूर्वीच वांद्रेतील घरी जाऊन त्याचे सांत्वन केले. सेशन्स कोर्टाच्या निकालाच्या आदल्या रात्री शाहरुख खानने सलमानची भेट घेतली होती.
सलीम खान समाधानी-
सलमान खानचे पिता सलीम खान यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाबाबत मी समाधानी आहे. माझ्या कुटुंबियांना आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया सलीम खान यांनी दिली आहे. आज संध्याकाळी आमचे संपूर्ण कुटुंब पनवेलच्या फार्महाऊसवर सेलिब्रेशन करण्यासाठी जाणार आहे असे सलीम खान यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...