आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षीदाराची उलटतपासणी घेतलीच नाही, सलमानच्या वकिलांचा अाराेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार कमाल खान याला अातापर्यंत तीन वेळा न्यायालयात हजर करण्यात अाले. मात्र सरकारी वकील त्याची उलटतपासणी घेण्यात अपयशी ठरले,’ असा अाराेप सलमानचे वकील अमित देसाई यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात केला.

‘हिट अँड रन’ प्रकरणात ठाेठावण्यात अालेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला सलमानने उच्च न्यायालयात अाव्हान दिले अाहे. त्याची सुनावणी न्यायमूर्ती ए. अार. जाेशी यांच्या न्यायालयात सुरू अाहे. कमाल खान हा गायक असून २८ सप्टेंबर २०१२ राेजी झालेल्या अपघाताच्या वेळी ताे सलमानसाेबत गाडीत हजर हाेता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला हाेता.
सलमानचा बचाव करताना अॅड. देसाई म्हणाले, ‘सत्र न्यायालयात कमाल खानला साक्षीदार म्हणून तीन वेळा हजर करण्यात अाले, मात्र त्याची उलटतपासणी सरकारी पक्षाने केली नाही. अाणि अाता हायकाेर्टात मात्र खान यांच्या साक्षीला विराेध केला जात अाहे, तर त्या वेळी खान यांची चाैकशी केली असती तर त्यामुळे या केसवर प्रकाश पडून सत्य बाहेर अाले असते. या प्रकरणातील अाणखी एक साक्षीदार, सलमानचा संरक्षक पाेलिस काॅन्स्टेबल रवींद्र पाटील याचा मृत्यू झाला असून सलमानचा चालक अशाेक सिंह याने यापूर्वीच अपघाताच्या वेळी अापण गाडी चालवत असल्याचे सांगितलेले अाहे.’ मात्र अाता कमाल खानच्या उलटतपासणीची गरज नसल्याचे सरकारी पक्षाचे मत अाहे.