आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीत तिघेच व सलमानच गाडी चालवत होता- कमाल खानची साक्ष उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- सलमानसोबत कोर्टात त्याचे वकिल श्रीकांत शिवदे (काळ्या कोटमध्ये)
मुंबई- हिट अँड रन केसप्रकरणी अभिनेता सलमान खानला सेशन्स कोर्टाने पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मात्र, सलमानला दिलेली शिक्षा मुंबई हायकोर्टाने स्थगित करीत त्याला जामीन मंजूर केला आहे. मुंबई हायकोर्टाने सलमान खानच्या वकिलांचा युक्तीवाद मान्य करीत त्याला जामीन मंजूर केला होता. तसेच यावेळी सलमान खानच्या वकिलांनी केवळ रविंद्र पाटीलची साक्ष ग्राह्य का धरली. या अपघाताचा आणखी एक साक्षीदार व प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या कमाल खानची साक्ष का घेतली नव्हती असे सांगत या प्रकरणी सविस्तर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनी व सेशन्स कोर्टाने घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या कमाल खानची साक्ष का नोंदवली नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे. आपल्याला माहित असेलच की कमाल खान गायक आहे व सध्या तो ब्रिटनमध्ये राहतो. कमाल खानने ब्रिटनमधील नागरिकत्व स्वीकारले आहे.
मात्र, मुंबई पोलिसांकडे गायक कमाल खानची साक्ष असल्याचे शनिवारी पुढे आले आहे. मुंबई पोलिसांकडे लेखी साक्ष देताना कमाल खानने म्हटले आहे की, अपघाताच्या त्या रात्री सलमान खान हाच गाडी चालवत होता व त्यात आम्ही तिघे जणच होतो. कमाल खानची ही लेखी साक्ष आता सार्वजनिक झाली आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या वकिलांनी शुक्रवारी मुंबई हायकोर्टात सलमान गाडी चालवत नव्हता व गाडीत एकून चार जण प्रवास करीत होते असा युक्तीवाद केला आहे. त्यामुळे सलमान खान यामुळे अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सरकारी वकील घरत यांचा गंभीर आरोप
सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू मांडणारे अॅड. प्रदिप घरत यांनी शनिवारी गंभीर आरोप केले. वृत्तवाहिन्यांशी बोलताना घरत म्हणाले, सेशन्स कोर्टाच्या निकालानंतर जेव्हा शिक्षेचे पत्र तयार करण्यात येत होते तेव्हाच कोर्टातील लाईट घालवली होती. ही लाईट तब्बल दोन घालवली होती. मुंबईसारख्या शहरात दोन तास लाईट कधीच जात नाही. कोर्टात तर लाईट गेली तर लागलीच लाईट सुरु करण्यात येते मात्र, त्या दिवशी लाईट कशी काय आली नाही.
यामागे काही षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे घरत यांनी सांगितले. सेशन्स कोर्टाचे आरोपपत्र मुंबई हायकोर्टात वेळेत पोहचू न शकल्यानेच हायकोर्टाला सलमानला दोन दिवसाचा जामीन मंजूर करावा लागला. या घटनेची चौकशी झाली पाहिजे असेही अॅड. घरत यांनी सांगितले.
पुढे वाचा, कमाल खानने वांद्रे पोलिस ठाण्यात हिंदीत लेखी दिलेली साक्ष... त्याच्या शब्दांत...
बातम्या आणखी आहेत...