मुंबई- बॉलीवूड सुपरस्टार
सलमान खान हिट अँड रन प्रकरणात दोषी आढळला आहे. या प्रकरणात सलमान दोषी ठरल्याने त्याला 10 वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. हा खटला तब्बल 13 वर्षे चालला आहे. या शिक्षेनंतरच सलमानच्या कारकीर्दीचे भवितव्य ठरणार आहे. बॉलीवूडने सलमानवर 200 कोटी रुपये गुंतवले आहेत. सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी
सलमान खानला दोषी धरले.
आपण खाली पाहूया, सलमान खानच्या हिट अॅंड रन प्रकरणी न्यायालयीन घटनाक्रम...
28 सप्टेंबर 2002- मुंबईतील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळ सलमानच्या गाडीचा अपघात, एक जण ठार आणि चार जण जखमी.
21 ऑक्टोबर 2002-
सलमान खानवर 304 (भाग-2) (सदोष मनुष्यवध) गुन्हा नोंदविण्यात आला.
24 ऑक्टोबर 2002- सलमान खानला पुन्हा अटक, मात्र तातडीने जामिन मंजूर
2003 साल
मार्च 2003- पोलिसांनी सलमान खानवर लावलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याला आव्हान
मे 2003- कोर्टाने सलमान खानचा अर्ज फेटाळत मॅजिस्ट्रेट कोर्टाला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाचा विचार करून आरोप निश्चिती करण्याचे आदेश दिले.
जून 2003- सलमान खानने या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले. हायकोर्टाने हा आरोप लागू होऊ शकत नाही असे मत नोंदवले.
ऑक्टोबर 2003- राज्य सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.
डिसेंबर 2003- सुप्रीम कोर्टाने मॅजिस्ट्रेटने कोर्टाला पुराव्यांची छाननी केल्यानंतर निर्णय घेण्याचे आदेश दिले.
साल 2006
ऑक्टोबर 2006- वांद्रे मॅजिस्ट्रेटने सलमान खानवरील आरोपांची निश्चिती केली.
साल 2007
22 मे 2007- सलमान खानने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचे केमिकल अॅनालिसीसच्या अहवालात उघड
साल 2011-
मार्च 2011- सलमानवरील आरोपात वाढ करण्याची सरकारी वकिलांची मागणी
साल 2012-
डिसेंबर 2012- सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करत मॅजिस्ट्रेट कोर्टाने सेशन्स कोर्टाने केस वर्ग केली.
साल 2013
मार्च 2013- सलमान खानने या निर्णयाला सेशन्स कोर्टात आव्हान दिले.
24 जून 2013- सेशन्स कोर्टाने सलमान खानचा अर्ज फेटाळला.
23 जुलै 2013- सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप सेशन्स कोर्टाने निश्चित केला.
डिसेंबर 2013- सेशन्स कोर्टाने नव्याने खटला चालवण्याचे आदेश दिले.
साल 2014
एप्रिल 2014- सम्बा गोवडा या पहिल्या साक्षीदाराने कोर्टात साक्ष नोंदवली.
साल 2015
25 मार्च 2015- विशेष सरकारी वकिलांनी साक्षी-पुरावे नोंदवून कामकाज पूर्ण केले.
20 एप्रिल 2015- बचाव पक्षाच्या वकिलांनी अंतिम युक्तीवाद पूर्ण केला. तसेच या खटल्याच्या निकालाची अंतिम तारीख 6 मे जाहीर केली.
6 मे 2015- सकाळी 11.15 वाजता सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी निकाल घोषित करीत सलमान खानला दोषी धरले आहे.