आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्लूला होऊ शकते 10 वर्षाची शिक्षा, साक्षीदार म्हणाला, नशेत होता सलमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत 2002 साली झालेल्या हिट अँड रन केसप्रकरणी अभिनेता सलमान खानची आजपासून ओळख परेड सुरु झाली आहे. सलमान खानच्या गाडीनेच चिरडल्याची साक्ष मियाँ शेख आणि सांभा कापड़ा गौड़ या साक्षीदाराने आज कोर्टात दिली. सलमान खान नशेत होता तसेच तो ड्रायव्हर सीटवर बसला होता व तेथूनच तो खाली उतरताना दिसला. गाडीत सलमानसह तिघे जण गाडीत होते. सलमान खानला साक्षीदाराने ओळखल्याने सलमानच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानण्यात येत आहे. सलमान खानवर हिट अँड रन प्रकरणी मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. सलमानला जास्तीत जास्त 10 वर्षाची सक्तमजुरी होऊ शकते.
मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीदरम्यान सलमान खानला 6 मे ला ओळख परेड सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच याप्रकरणी 2 मे रोजी पंचांची साक्ष नोंदवली गेली आहे. आता साक्षीदारांनीही सलमान खानला याप्रकरणात ओळखल्याने हा खटला निर्णायक वळणावर पोहचल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. दरम्यान, सलमान खानला साक्षीदारांनी ओळखल्याने सलमान या प्रकरणात अडकेल असे बोलले जात आहे.
सलमानच्या गाडीने 28 सप्टेंबर 2002 रोजी पाच जणांना चिरडले होते. यामध्येस एकाचा मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण नीट न हातळल्याने सलमानवर आरोप निश्चित करता येत नव्हते. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाचा खटला नव्याने दाखल करून सुनावणी करण्याचे आदेश कोर्टाने डिसेंबर 2013 मध्ये दिले होते. त्यानुसार हा खटला नव्याने उभा आहे. त्याचाच भाग म्हणून पुन्हा साक्षीदार, पंच व ओळख परेड सुरु आहे. आता तब्बल 11 वर्षांनंतर सलमानवर आरोपांची निश्चिती झाली आहे.
दरम्यान यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने सलमानवर कडक ताशेरे ओढले होते. सलमान खानला अशा बेदरकार ड्रायव्हिंगमुळे कोणाचाही जीव जावू शकतो याची पूर्ण कल्पना होती. सलमानच्या बॉडीगार्डने त्याला त्याच्या कृत्याच्या परिणामांची कल्पना दिली होती, पण त्याने जाणूनबजून गाडी वेगात चालवणे सुरुच ठेवले, असे कोर्टाने निरीक्षण नोंदवत त्याच्यावर आरोप निश्चित केले आहेत.
सलमान खानच्या फिल्मी करिअरला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलमान सध्या किक चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यासाठी त्याला विदेशात जायचे आहे. मात्र आजच्या सुनावणीमुळे कोर्टाने त्याला परदेशी जाण्यासाठी परवानगी दिलेली नाही.