आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफेअर्समुळे चर्चेत राहिला आहे हा लेखक, मॉडल व अनिभेत्रींबरोबर केलाय विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान रश्‍दी यांनी चार विवाह केले. मात्र एकही टिकली नाही. - Divya Marathi
सलमान रश्‍दी यांनी चार विवाह केले. मात्र एकही टिकली नाही.
मुंबई - भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्‍दी जगातील सर्वात वादग्रस्त लेखकांमध्‍ये समावेश होतो. 19 जून, 1947 रोजी मुंबईत जन्मलेल्या रश्‍दी आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्लस-माइनस मालिके अंतर्गत divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे, की रश्‍दी लेखना व्यतिरिक्त इतर कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिलेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते इंग्लंडमध्‍ये राहत आहेत. त्यांनी चार विवाह केले व ती चारही विवाह तुटले. एकेकाळी त्यांच्या प्रेम प्रकरणांची बरीच चर्चा झाली आहे. चार वेळा विवाह, चार वेळा त्यांचा घटस्फोट झाला...

- सलमान रश्‍दींंचा जन्म झाल्यानंतर त्यांना कुटुंबीयांसाबेत ब्रिटनला नेण्‍यात आले. इंग्लंडच्या रग्बी स्कूलमध्‍ये त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले.
- यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात इतिहास या विषयात अध्‍ययन केले.
- लेखक बनण्‍यापूर्वी रश्‍दी यांनी दोन जहिरात संस्थांमध्‍ये कॉपी रायटर म्हणूनही काम केले.
- सलमान यांचे पुस्तक 'द सॅटॅनिक व्हर्सेज' बरीच वादग्रस्त ठरले. या पुस्तकावरुन काही धार्मिक संघटनांनी त्यांच्याविरुध्‍द फतवा जारी केला.
- त्यांच्या या पुस्तकावर अनेक देशांमध्‍ये बंदी आहे.
चार वेळा विवाह केला आहे
- आतापर्यंत चार वेळा विवाह केलेल्या रश्‍दी यांनी अनेक महिलांशी प्रेम प्रकरण केले.
- त्यांची पहिली पत्नी क्लारिसा लुअर्द ही होती. त्यांचा विवाह 1976 मध्‍ये झाला व घटस्फोट 1987 मध्‍ये झाला. दोघांना जफर नावाचा एक मुलगा आहे.
- यानंतर सलमानने अमेरिकन कादंबरीकार मरियन विग्गिन्सशी 1987 विवाह केला. हा विवाह केवळ 5 वर्ष टिकला व 1993 मध्‍ये दोघांनी घटस्फोट झाला.
- एलिझाबेथ वेस्टशी रश्‍दी यांनी तिसरा विवाह केला. हा विवाह पाच वर्ष टिकला व त्यांचा 2004 मध्‍ये घटस्फोट झाला.
चर्चेत राहिले भारतीय मॉडलशी रश्‍दींचे प्रेमप्रकरण व विवाह
- भारतीय मॉडल पद्मालक्ष्‍मीसोबत सलमान रश्‍दींचे प्रेमप्रकरण व विवाह बरेच चर्चेत राहिला.
- आपल्यापेक्षा कमी वयाच्या पद्मासोबत 2004 मध्‍ये सलमानशी विवाह केला. तेव्हा पद्मा 28 वर्षांची होती व रश्‍दी हे 51 वर्षांचे.
- मात्र इतर तीन विवाहांप्रमाणे रश्‍दींचा हा विवाह जास्त दिवस टिकला नाही. दोघांनी 2 जुलै 2007 रोजी घटस्फोट घेतला.
हे आहेत रश्‍दी यांचे चर्चित कादंब-या
- रश्‍दींचे पहिली कादंबरी 'ग्राइमल' 1975 मध्‍ये आली. ती फार लो‍कप्रिय ठरली नाही.
- मात्र त्यांची दुसरी कादंबरी 'मिडनाइट्स चिल्डन'(1981) ने एका रात्री प्रसिध्‍दी मिळवली.
- रश्‍दी यांच्या या पुस्तकाला मागील 100 वर्षांमध्‍ये लिहिली गेलेली सर्वोत्कृष्‍ट पुस्तकाचा मान मिळाला आहे.
- यानंतर त्यांनी 'शेम'(1983), द जगुआर स्माईल'(1987), 'द सॅटॅनिक व्हर्सेज' (1988), 'ईस्ट-वेस्ट' (1994), 'द मूर्स लास्ट साई' (1995), 'द ग्राउंड बिनीथ हर फीट' (1999), 'शालीमार द क्राउन' (2005) यासारखी उत्कृष्‍ट पुस्तके लिहिली.
इस्लामिक संघटनांनी जारी केला आहे फतवा
- रश्‍दींचे वादग्रस्त पुस्तक ' द सॅटॅनिक व्हर्सेज' विरुध्‍द अनेक इस्लामिक संघटनांनी फतवा जारी केला आहे.
- अनेक देशांमध्‍ये या पुस्तकावरुन हिंसक घटनाही घडल्या आहेत. भारताने रश्‍दींच्या पुस्तकांवर बॅन केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा सलमान रश्‍दी यांचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...