आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Says There Is Always Be A Threat Of Being Punished In Hit And Run Case

शिक्षा हाेण्याचे भूत कायमच मानगुटीवर, ‘हिट अँड रन’प्रकरणी सलमानची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन आणि इतर प्रकरणात न्यायालयाकडून होणाऱ्या शिक्षेचे भूत कायम मानगुटीवर असल्याची प्रांजळ कबुली अभिनेता सलमान खान याने साेमवारी एका मुलाखतीत दिली.

सलमान म्हणाला, न्यायालय काय शिक्षा देते हे पाहावे लागेल. जर तुम्ही पाच- पाच वर्षे मोजले तर दहा वर्षे होतात. हेच माझ्या व पालकांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. सध्या हिट अँड रन प्रकरणाचा खटला उच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर माझे आयुष्य कसे असेल हे सांगता येणे कठीण आहे. ज्या वेळी मी चित्रीकरणात व्यग्र असतो, त्याच वेळी माझ्यावरील प्रकरणांची चिंता सतावत असते. तसेच आई - वडिलांना याचीच काळजी असते. सध्या सलमानविरोधात हिट अँड रन, काळवीट शिकार आणि एका प्रकरणात न्यायालयात खटला सुरू आहे.

लोक चांगली कामे विसरतील
मी सोनमसोबत रोमान्स करत असतो. जॅकलिनसोबत डान्स करत असतो. परदेशात चित्रीकरण करत असतो. त्याच वेळी भीतीही असते. लोकांना आमच्या चित्रपटाला मिळालेले ६०० कोटी दिसतात. मात्र, त्यातील किती पैसे मला भेटतात हे त्यांना काय माहीत. मला जर शिक्षा झाली तर मी केलेेली चांगली कामे लोक विसरून जातील, असेही तो म्हणाला.