आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठ्यांचे मोर्चे म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे डावपेच, फडणवीस धोका -शिवसेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्याभर सध्या मराठा समाजाचे विशाल मोर्चे काढले जात आहेत. त्याला मराठा समाजाकडून भरभरुन प्रतिसाद लाभत आहे. या पार्श्वभूमिवर सामना या मुखपत्रातून शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेत भविष्यावर टिप्पणी केली आहे.
मराठा मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्रात निर्माण झालेली अस्वस्थता मुख्यमंत्री फडणवीस कशी दूर करणार? मराठा मोर्चे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून आपल्याला काढण्याचा कट असल्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर ती त्यांची हतबलता आहे. एखाद्या समाजाने त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढले म्हणून कुणाला मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले नाही. मात्र खुर्चीला स्वकियांकडूनच सुरुंग लावले जात नाहीत ना याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. मराठा समाजाचे मोर्चे म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे डावपेच दिसतात. दगड भिरकावले आहेत. कुणाकुणाची कपाळे फुटतात ते लवकरच दिसेल.
मराठा मोर्चा, दगड भिरकावले आहेत!
महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी अशावेळी सगळेच पुढारी आघाडी घेतात, पण हे मोर्चे म्हणजे वाहती गंगा नसून समुद्रात उठलेले वादळ आहे. या तुफानाशी सामना करणारे भक्कम नेतृत्व आजतरी महाराष्ट्र राज्यात दिसत नाही. मराठा समाजाची पहिली मागणी अशी आहे की, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तत्काळ फासावर लटकवावे.
त्यांची दुसरी मागणी अशी आहे की, दलित अत्याचारविरोधी कायदा म्हणजे ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करावा. तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आहे. या मागण्यांसाठी जिल्ह्याजिल्ह्यांत लाखोंचे मोर्चे निघतात व त्यात शाळकरी मुलींपासून आबालवृद्धांपर्यंत लोक सामील होतात. हे वरवर सहज वाटले तरी महाराष्ट्राचे समाजमन खवळून उठल्याचे हे द्योतक आहे. कोपर्डीतील बलात्कार्‍यांना फाशीचीच सजा मिळायला हवी याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी रीतसर खटला चालवायला हवा व न्यायालयाने तसा निकाल द्यायला हवा.
कसाब व अफझल गुरूसारख्यांनाही त्याच प्रक्रियेतून जावे लागले. कोल्हापूरचे खासदार छत्रपती हे पंतप्रधान झाले व विनायक मेटे राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी त्यांनाही याच पद्धतीने काम करावे लागेल. कोपर्डीतील बलात्कार्‍यांना फासावर लटकवून लवकरात लवकर न्याय व्हावा ही महाराष्ट्राची इच्छा आहे. अ‍ॅट्रॉसिटीबाबत देशभरातच खदखद आहे. या कायद्याचा गैरवापर होत आहे याची कबुली सगळेच देतात.
पुढील स्लाईडवर वाचा....अ‍ॅट्रॉसिटीत सुधारणा... मराठा मोर्चामागे राजकारण....
(सौजन्य- सामना)
बातम्या आणखी आहेत...