आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राईकनंतर दीडशहाण्यांची पोपटपंची -संजय निरुपम यांचे नाव न घेता समाचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्जिकल स्ट्राईकबाबत केंद्र सरकारने पुरावे सादर करावे, अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर सरकारने या कारवाईचा उगाद उदोउदो करु नये, असे शहाणपणही शिकवले. त्यावर हल्ला करताना शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात 'दीडशहाण्यांची पोपटपंची' अशा शेलक्या शब्दांत उतारा काढला आहे. वाचा सामनाच्या अग्रलेखात आणखी काय काय सांगितले आहे.... कुणाकुणावर झाले आहे फायरिंग....
बंडलबाजीशी स्पर्धा का करता!
बंडलबाज पाकिस्तानने ‘सर्जिकल हल्ल्या’चे सत्य नाकारले हे त्यांच्या नौटंकी स्वभावास धरूनच झाले. पण अशा सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्‍यांनी शंका व्यक्त कराव्यात याचे आम्हाला दु:ख होत आहे. पाकिस्तानने बंडलबाजीत अनेक पदके जिंकली आहेत. त्यांच्या बंडलबाजीशी आपल्याकडील लोकांनी स्पर्धा करू नये. काही गोष्टी गोपनीयच राहाव्यात. राष्ट्रीय सुरक्षेचे बिंग फुटले तर गडबड होईल!
सर्जिकल ऑपरेशन
बंडलबाजीशी स्पर्धा का करता!

मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतही सर्जिकल हल्ले झालेच होते, पण त्याचा राजकीय गवगवा कधीच केला नाही, असे आता अरुण शौरी यांनी सांगितले आहे. चिदंबरम यांनीसुद्धा अशा प्रकारचे टोकदार विधान आधीच केले आहे व त्यापाठोपाठ सर्जिकल हल्ल्यास खरे-खोटे ठरविण्याचा विडा उचलून अनेक दीडशहाणे पोपटपंची करू लागले आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ आहे. आपल्या जवानांचे मनोबल खच्ची करण्याचा डाव आहे. ज्यांना प्रत्यक्ष बंदूक हाती घेऊन सीमेवर जाऊन लढता येत नाही अशा मंडळींनी संकटकाळात तोंड बंद ठेवावे हीसुद्धा देशसेवाच आहे. उरी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सूड घ्यावा, अशी मागणी देशभरातूनच उठू लागली व सूड किंवा बदला घेतल्यावर जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
मात्र पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच जाहीर केले की, ‘हिंदुस्थानकडून अशा प्रकारचा कोणताही सर्जिकल हल्ला झाला नसून तसा हल्ला झाल्यास चोख उत्तर देऊ!’ पाकिस्तान हा एक नंबरचा बंडलबाज देश आहे. हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याची त्यांची बंडलबाजी नेहमीच सुरू असते. लादेन आमच्या देशात लपला नसल्याची थाप ते मारतच होते, पण अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारल्यावर त्यांची बंडलबाजी उघडी पडली.
पुढील स्लाईडवर वाचा... सामनाने दाऊदबद्दल काय म्हटले आहे... जावेद मियांदादला कसे ठोकले आहे....
सौजन्य- सामना
बातम्या आणखी आहेत...