आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचे निधन; अाज अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे (७२) यांचे मंगळवारी सकाळी सावंतवाडी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. बुधवारी गोरेगाव येथे विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.   दुखंडे हे माजी केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांचे निकटचे सहकारी होते. मालवण विधानसभा मतदारसंघात त्यांनी १९९५ मध्ये नारायण राणे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.  

युक्रांद युवक चळवळीपासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली हाेती.  राष्ट्र सेवा दल, छात्र भारती, जनता दल असा प्रवास करताना दुखंडेंनी विद्यार्थी, कामगार, कोकण विकास या प्रश्नांवर संघर्ष केला. कोकणातील मुलांना रेल्वेत नोकरी मिळावी म्हणून त्यांनी जनाधिकार समितीची स्थापना केली होती.
 
बातम्या आणखी आहेत...