आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samajwadi Party Decleared Another Few Candiate For Loksabha Seats

सपाची दुसरी यादी जाहीर, नांदेड, अहमदनगरचे उमेदवार बदलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी समाजवादी पक्षाने आज दुसरी यादी जाहीर केली. याचबरोबर पहिल्या यादीतील दोन ठिकाणीचे उमेदवार बदलले आहेत. नांदेडमधून बाळासाहेब मोरे यांच्याऐवजी बाळाजी शिंदे यांच्या गळ्यात माळ घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर अहमदनगरमधीलही उमेदवार बदलला आहे. येथील पहिल्या यादीत नाव जाहीर झालेले उमेदवार राजेंद्र पवार काही कारणास्तव निवडणूक लढविणार नसल्याचे सपाने म्हटले आहे.
या यादीत आणखी चार उमेदवारी नावे सपाने जाहीर केली आहे. यात बुलढाण्यातून वसंत दांडगे, परभणीतून अजय कारंडे-पाटील, उस्मानाबादमधून अॅड. शैलेंद्र यावलकर तर लातूरमधून अॅड. बाळाजी कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सपा राज्यात एकून 22 जागा लढविणार आहे. त्यानुसार पहिल्या यादीत सपाने 12 उमेदवार जाहीर केले होते. आता आणखी चार जाहीर केले आहेत.