आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमनच्या पत्नीला खासदार बनण्‍याची मागणी करणारा \'सपा\' नेता निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिअो पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिअो पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा
मुंबई- सन 1993 मधील मुंबईवरील साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीवरून देशात आता राजकारण केले जात आहे. याकूबची पत्नी राहिन मेमनला खासदार बनवा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद फारुख घोसी यांनी केली. या बाबत त्‍यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांना पत्र लिहिले होते. पण, त्‍यांना ही मागणी चांगलीच अंगलट आली असून, पक्षाने त्‍यांच्‍यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

याकूब मेमनसोबतच त्याची पत्नी राहिन हिला देखील मुंबईतील साखळी स्फोटांप्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु, पुराव्या अभावी कोर्टाने राहिनची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, ती अनेक वर्ष तुरुंगातच होती. या काळात तिने तुरुंगातच मुलगी जुबैदाला जन्म दिला होता.

राहिन हिला तुरुंगात असताना असाह्य यातना सहन कराव्या लागल्या. तसेच ती सद्यस्थितीतही असहाय्य अवस्थेतच आहे. त्यामुळे तिला पक्षाने राहिनला खासदार बनवावे, असे मोहम्मद फारुख घोसी यांनी आपल्या मागणी पत्रात लिहिले आहे.

देशात याकूबच्या पत्नीसारखे कित्येक असहाय्य आहेत. त्यांना पक्षाने मदत करायला हवी. त्यांची लढाई पक्षाने लढायला हवी. देशातील मुस्लिम लोक स्वत:ला असहाय्य समजत आहेत. त्यांना पक्षाने मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे, असेही घोसी यांनी पक्षाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, 30 जुलैला नागपुर मध्यवर्ती तुरुंगात याकूबला फासावर लटकवण्यात आले. नंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांना सुपुर्द करण्यात आला. मेमन कुटुंबियांनी याकूबचा मृतदेह मुंबईतील बडा कब्रिस्तानमध्ये दफन केला. याकूबच्या जनाज्यात (अंत्ययात्रेत) दहशतवादी घातपात घडवू शकतात, या पार्श्वभूमी पोलिस लक्ष ठेवून होते. यामुळे मुंबई पोलिसांनी याकूबच्या जनाज्याचे व्हिडिओ शूटिंग केलाची माहिती मिळाली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, समाजवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद फारुख घोसी यांचे मागणी पत्र...
बातम्या आणखी आहेत...