आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेड राजकारणात; राजकीय पक्ष म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाली मान्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- संभाजी ब्रिगेड या मराठा सेवा संघाच्या युवा संघटनेला राज्य निवडणूक अायाेगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे महिनाभराने होणाऱ्या निवडणूक आखाड्यात ब्रिगेड उतरणार असून लवकरच पक्षाची अधिकृत घोषणा होणार आहे.

जेम्स लेन प्रकरणात आक्रमक भूमिकेमुळे संभाजी ब्रिगेड चर्चेत आली होती. गेल्या आठ महिन्यांपासून आमचा पाठपुरावा सुरू असून २४ ऑक्टोबरला आयोगाने मान्यतेचे पत्र दिल्याचे संघटनेचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी सांगितले. पक्षाचा राजकीय अजेंडा काय असेल असे विचारले असता, शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांना हमी भाव आणि दारूमुक्त गाव हा आमच्या राजकीय भूमिकेचा मूलमंत्र असेल. अगोदर शेकापमध्ये सक्रिय होण्यावर आमचा विचारविनिमय सुरू होता. मात्र त्यापेक्षा आपलाच राजकीय पक्ष असावा, या भूमिकेतून राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात येण्याचे ठरले, असे ते म्हणाले.
असे असले तरीही शेतकरी कामगार पक्ष या समविचारी पक्षाबरोबर भविष्यात आघाडीचा विचार होऊ शकतो असेही भानुसे म्हणाले.

राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार
लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड पक्ष बनल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मात्र राजकीय आखाड्यात उतरल्याने संभाजी ब्रिगेडचे उपद्रवमूल्य कमी होईल, असे विश्लेषकांना वाटते.
बातम्या आणखी आहेत...