आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी राजे पर्यटन विभागाचे राजदूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खासदार छत्रपती संभाजी राजे यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राजदूतपदी निवड करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी संभाजी राजे यांच्या उपस्थितीत सोमवारी ही घोषणा केली. तसेच राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एक हेरिटेज पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. यासाठी छत्रपती संभाजी राजे यांचा समावेश असलेली एक समिती येत्या आठ-दहा दिवसांत अहवाल तयार करेल, असेही रावल यांनी सांगितले.

रावल यांनी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर संभाजी राजे यांच्याशीही गड किल्ल्यांबाबत चर्चा केली. रावल म्हणाले, राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली. संभाजी राजे यांनी राजस्थानच्या धर्तीवर गड- किल्ल्यांचा विकास करण्यासाठी हेरिटेज धोरण तयार करण्याची सूचना केली. संभाजी राजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला असून किल्ले व गड यांचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांच्या सूचनेनुसार पर्यटन विभागाने आता हेरिटेज धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासाठी संभाजी राजे यांनाच राजदूत करण्याचा निर्णयही घेतला आहे.’ राज्यातील गड किल्ल्यांमध्ये व आसपास असलेले अनधिकृत बांधकाम, झोपडपट्ट्या हटवून किल्ले पर्यटनासाठी योग्य करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही रावल यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

गड, किल्ले आवडता विषय
गड, किल्ले हा माझा आवडता विषय असून मी गेली अनेक वर्षे यासाठी काम करत आहे. राजस्थानच्या धर्तीवर राज्यातील किल्ल्यांचा विकास कसा करता येईल, याकडे मी लक्ष देत होतो. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या किल्ल्यांच्या विकासात पर्यटनाचा समावेश केल्यास केंद्रीय पुरातत्त्व खाते पूर्णपणे मदत करते. राजस्थानमध्ये हे दिसून आले आहे. त्यामुळे किल्ल्यांचा विकास करताना त्यात पर्यटनाचा समावेश केल्यास राज्यातील पर्यटन वाढेल. माझा अभ्यास असल्यामुळेच मला राजदूत व्हावी म्हणून गळ घातली. मी काही सेलेब्रिटी नाही, तरीही मी ही ऑफर स्वीकारली आहे.
छत्रपती संभाजी राजे, खासदार
बातम्या आणखी आहेत...