आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीर भुजबळांचाही तुरुंगातील मुक्काम वाढला, 31 मार्चपर्यंत कोठडीत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता समीर भुजबळ यांनाही 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. समीर भुजबळ यांची आज न्यायलयीन कोठडी संपत होती. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. गुरुवारी छगन भुजबळ यांनाही 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दोघेही भुजबळ चुलते-पुतण्याचा मुक्काम सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. समीर भुजबळ यांना 1 फेब्रुवारी रोजी अटक झाली होती. तेव्हापासून तुरुंगात आहेत.

छगन भुजबळांवर दुसरे आरोपपत्र महिनाभरात-

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अगोदरच तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कलिना येथील ग्रंथालय भूखंड प्रकरणातही महिनाभरात आरोपपपत्र दाखल होणार असल्याची माहिती एसीबीतील सूत्रांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरी संकुलातील सरकारी जमीन परस्पर एका विकासकाला हस्तांतरित केल्याप्रकरणी ‘एसीबी’ने भुजबळ व बांधकाम विभागाच्या पाच अधिकाऱ्यांविरोधात जून 2015 मध्ये गुन्हा दाखल केला होता.
उच्च न्यायालयाने डिसेंबर 2014 मध्ये या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती एसीबीने भुजबळ यांच्यासह तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, तत्कालीन कार्यकारी अभियंता हरीश पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता अनिलकुमार गायकवाड, तत्कालीन अवर सचिव संजय सोलंकी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव एम. एच. शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. लोकसेवकाने केलेली गुन्हेगारी स्वरूपाची वर्तणूक, फसवणूक, खोटी कागदपत्रे सादर करणे, सरकारी महसुलाचे नुकसान तसेच गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आणि त्यात एकमेकांना साहाय्य करणे या आरोपांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबतचे सबळ पुरावे मिळवण्यात तपास पथकाला यश मिळाल्याचा दावा एसीबीच्या एका अधिकाऱ्याने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...