आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने सांगितले कुणाला का मिळाले मंत्रिपद, वाचा त्यामागचे राजकारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मंत्रिमंडळचा विस्‍तार केला. यात शिवसेनेला स्‍थान मिळाले नाही. त्‍यामुळे शिवसेनेने 'सामना'च्‍या अग्रलेखातून या विस्‍तारीकरणाचा आढावा घेतला. शिवाय कॉंग्रेसचे पंतप्रधान आणि त्‍यांच्‍या मंत्रीमंडळाचे कौतुकही केले. तसेच लोकशाहीत बहुमत हे निसरड्या लादीवरील शेवाळाप्रमाणे असते. म्हणूनच विस्तारित मंत्रिमंडळास पाय घट्ट रोवून काम करावे लागेल, असा उपदेशाचा डोसही भाजपला पाजला.
म्‍हटले, मंत्रिमंडळ विस्ताराची गाजरे
'सामना'च्‍या अग्रलेखात म्‍हटले, 'केंद्रातील मोदी सरकारचा विस्तार झाला आहे. आज होणार, उद्या होणार किंवा होणारच नाही, अशा प्रकारच्या राजकीय चर्चांना त्यामुळे आळा बसेल. मोदी सरकारला दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे दोन वर्षांचे प्रगती पुस्तक समोर ठेवून लेखाजोखा मांडण्याचे कारण नाही. पण, शेवटी मंत्रिमंडळ हेच सरकार असते व मंत्रिमंडळाच्या कामगिरीवर सरकारचे मूल्यमापन होत असते. केंद्रातील मंत्रिमंडळात मंत्र्यांची ‘आवक-जावक’ सुरूच असली तरी ‘मोदी’ हाच एकमेव मंत्रिमंडळाचा चेहरा आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात एकास एक तालेवार नेते होते. मग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, बाबू जगजीवनराम असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाणांचासुद्धा उल्लेख करावाच लागेल. मनुष्यबळ विकास मंत्रालयास ओळख मिळाली पी. व्ही. नरसिंह रावांमुळेच, पण देशाला अर्थमंत्री आहे व तो काम करतोय हे जगाला कळले ते मनमोहन सिंग यांच्यामुळे. अर्थात त्या तोडीचे नेते आता निर्माण होणार नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनाच सर्व भार पाहावा लागत असेल तर काय करायचे? अधूनमधून मंत्रिमंडळ विस्ताराची गाजरे दाखवावी लागतात तर काही वेळेस विस्ताराचे पत्ते पिसून पाने वरखाली करावी लागतात. तसे पिसणे पुन्हा एकदा झाले आहे. '

पुढील स्‍लाइडवर वाचा, विस्‍तारीकरणाचे सांगितले राजकीय गणित...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)