आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samrt City Yojana, 20 City Decleared Today, How Much From Maharashtra?

स्मार्ट सिटी शहरांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून पुणे, सोलापूरचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रातील मोदी सरकारने देशातील 100 शहरे स्मार्ट सिटी करण्याचा महत्त्वकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशभरातील 100 शहरे यापूर्वीच निवडली आहेत. आता पहिल्या टप्प्यात यातील 20 शहरे विकसित करण्यात येणार आहेत. या 20 शहरांची यादी आज जाहीर करण्यात आली. केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू दुपारी तीन वाजता दिल्लीत ही नावे जाहीर करताना महाराष्ट्रातील दोन शहरांच्या नावाची घोषणा केली. पुणे व सोलापूर या दोन शहरांचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाणार आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत देशभरातील या शहरांचा कायापालट होणार आहे. केंद्र सरकारच्या या अतिशय महत्त्वाच्या योजनेत महाराष्ट्रातून 10 शहरे निवडली आहेत. पहिल्या टप्प्यात यात किती व कोणत्या शहरांचा समावेश होणार याची उत्सुकता होती.
महाराष्ट्रातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि सोलापूर या 10 शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश आहे. या योजनेतून नवी मुंबई शहर बाहेर पडले आहे. त्याजागी पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात ही 20 शहरे होणार स्मार्ट
दिल्ली, पुणे, सोलापूर, भुवनेश्वर, जयपूर, सूरत, कोची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम, धवनगिरी, इंदौर, कोईम्बतूर, काकीनाडा, बेळगाव, उदयपूर, गुवाहाटी, चेन्नई, लुधियाना, भोपाल.

कोणत्या राज्यातील किती शहरे?
स्मार्ट सिटींच्या यादीत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 13 शहरांचा समावेश आहे. यानंतर तामिळनाडू 12, महाराष्ट्र 10, मध्य प्रदेश 7, गुजरात आणि कर्नाटक प्रत्येकी 6, राजस्थान आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी 4, आंध्र, पंजाब आणि बिहारच्या प्रत्येकी तीन शहरांचा समावेश आहे.
काय आहे स्मार्ट सिटी योजना-
- देशातील 100 स्मार्ट सिटीवर पुढील पाच वर्षात तब्बल 48 हजार कोटी खर्च करण्यात येणार
- 100 शहरांच्या यादीत 24 राजधान्यांचा समावेश, ‘स्मार्ट सिटी’ योजनेत राज्य आणि केंद्र सरकारचा वाटा 50-50 टक्क्यांचा असेल.
- स्मार्ट सिटीत घरगुती गॅस, सिलिंडरऐवजी पाइपलाइनने गॅस पुरवठा, ई-गव्हर्नन्सलाही प्रोत्साहन, पाणीपट्टी, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, पुननरेंदणी व इतर सेवांसाठी रांगेत ताटकळत राहण्याची गरज नसेल. मोबाइल किंवा ऑनलाइन अर्ज, परवानगी मिळवता येईल व बिलही भरता येईल.
- बंगळुरूच्या धर्तीवर पेयजल व अन्य वापराच्या पाण्याचा पुरवठा वेगवेगळा होईल. पाणी किंवा गॅस पाईपलाईनमध्ये गळती झाल्यास तत्काळ अलर्ट मिळेल व जीपीएसद्वारे संबंधित ठिकाण हेरून दुरुस्ती केली जाईल.
-सिंगापूरच्या धर्तीवर कचरा पेट्यांवर जीपीएसद्वारे क्षणोक्षणी देखरेख ठेवली जाईल. कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाईल. विविध श्रेण्यांनुसार कचरा उचलला जाईल. उदा. प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक व घरातील कचरा, इत्यादी.