आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षानंतर कबरमधून काढले या मुलीचे प्रेत, पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता धक्‍कादायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/मुंबई- फॅशन डिझायनिंगला शिकत असलेल्‍या सनम हसन या विद्यार्थिनीचा 2012 मध्‍ये मृत्‍यू झाला होता. सीबीआय आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपासाचा भाग म्‍हणून चार वर्षानंतर सनमचे प्रेत कबरमधून बाहेर काढले, त्‍यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सनमच्‍या शवविच्‍छेदनाचा अहवाल समोर येताच काही धक्‍कादायक बाबी समोर आल्‍या. जाणून घ्‍या शवविच्‍छेदनाच्‍या रिपोर्टमध्‍ये असे काय होते, कसा झाला सनमचा मृत्‍यू..
>> ती साजरा करत होती 19 वा वाढदिवस..
पुण्‍यातील सिंबॉयसिस इंस्टीट्यूटमध्‍ये फॅशन डिझाइनिंगचा कोर्स करत असलेली सनम हसन 3 ऑक्‍टोंबर 2012 ला तिचा 19 वा वाढदिवस साजरा करत होती. पार्टीमध्‍ये अचानक तिची प्रकृती बिघडली आणि उपचारासाठी तिला पुण्‍यातील रूबी हॉल क्लिनिकमध्‍ये दाखल करण्‍यात आले. तेथे उपचारादरम्‍यान तिचा मृत्‍यू झाला.
>> तेव्‍हा शवविच्‍छेदनाच्‍या रिपोर्टमध्‍ये म्‍हटले होते..
सनमच्‍या कुटुंबियांचा या प्रकरणात संशय बळावला. त्‍यांनी सनमचे शवविच्‍छेदन केले त्‍यामध्‍ये ती पुरुष असल्‍याचे सांगण्‍यात आले. या रिपोर्टने सर्वांना धक्‍काच दिला होता; या रिपोर्टनुसार सनमचे हृदय हे पुरूषाचे होते. मृत्‍यूपूर्वी तिच्‍या हृदयाचा 70 टक्‍के भाग ब्लॉक झाला होता.
>> तिच्‍या छातीवर होते जखमांचे निशान..
याच शवविच्‍छेदनादरम्‍यान आणखी एक बाब समोर आली की, सनमच्‍या छातीवर सुमारे तीन सेंटीमीटर निशान होते. शिवाय तिला चार इंजेक्शन देण्‍यात आले होते ही बाबही समोर आली. रिपोर्टनुसार सनमचा मृत्‍यू हृदयातील ब्लाकेज आणि जास्‍त नशा केल्‍यामुळे झाला होता. अवघ्‍या मेडिकल विश्‍वासाठी तिचा रिपोर्ट हा धक्‍कादायकच होता. कारण सनम ही खेळात अव्‍वल होती आणि मृत्‍यूच्‍या एकदिवस आधीही ती फीट होती.
>> सनमच्‍या कुटुंबियांना हत्या आणि बलात्‍काराचा संशय..
सनमवर आधी बलात्‍कार केला गेला नंतर तिची हत्‍या करण्‍यात आली, या संशयातून तिच्‍या पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती. सनमच्‍या मृत्‍यूला चार वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. पोलिसांना या प्रकरणात यश आले नाही, त्‍यामुळे आता प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
>> सनमचा मृत्‍यू एक रहस्‍य..
सनमचा मृत्‍यू हे अजूनही एक रहस्‍यच आहे. वाढदिवसाच्‍या दिवशी रात्रभर ती तिच्‍या मित्रांसोबत थांबलेली होती. दुस-या दिवशी तिच्‍या घरी हॉस्‍पिटलमधून फोन आला की, सनमचा मृत्‍यू झाला आहे. विशेष म्‍हणजे वाढदिवसाच्‍या रात्री जे मित्र तिच्‍यासोबत होते, त्‍यापैकी कोणीही तिला हॉस्‍पिटलमध्‍ये आणले नव्‍हते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, सनम हसनचे Photos..
वाचा, चार वर्षानंतर कबरमधूून काय निघाले..
समनच्‍या मृत्‍यूनंतर तिच्‍या Facebook वर होत्‍या वादग्रस्‍त Comments..
बातम्या आणखी आहेत...