आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बस्फोट प्रकरणी ‘सनातन’च्या सदस्याला जामीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ठाण्यातील नाट्यगृहात 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सनातन संघटनेचा कार्यकर्ता विक्रम भावे याला उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बॉम्बस्फोट झाला होता. घटनेनंतर भावेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. यातील भावे आणि रमेश गडकरी यांना न्यायालयाने दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.


बॉम्बस्फोटानंतर भावे पाच वर्षांपासून तुरुंगात आहे. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्याचे वकील संजीव पुनलेकर यांनी न्यायालयात केली. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भावेला वीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. गेल्या आठवड्यात रमेश गडकरी याचीही न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली होती.