आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातनचे 'ते' पत्र जाहीर धमकीच- सचिन सावंत; अबुनुकसानीचा दावा ठोकणार- वर्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी विद्यार्थ्याच्या सुरक्षेबाबत सनातन संस्थेने पोलिस विभागाला दिलेले पत्र म्हणजे जाहीर धमकी असून या संदर्भात सनातनविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी म्हटले आहे की, मुळात सदर साक्षीदाराला धोका असेल तर तो सनातनकडूनच असण्याची भीती आहे. आता तीच सनातन संस्था सदरहू साक्षीदाराच्या जीविताबाबत चिंता व्यक्त करीत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. सनातनने पोलिसांना पाठवलेल्या पत्रात सदर साक्षीदाराचे नाव उघड करण्यात आले आहे. शिवाय सदर साक्षीदार कोणत्या वेळी कुठे जातो, कुठे असतो याचीही इत्थंभूत माहिती या पत्रामध्ये आहे. यावरून सनातनने सदर साक्षीदारावर पाळत ठेवल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सावंत यांनी केली.
'सनातन'ची मानहानी करणा-या सावंतांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- सनातन संस्था
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेल्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक म्हणाले, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाच्या संरक्षणासंदर्भात सनातन संस्थेने कोणत्याही प्रकारचे पत्र पाठवलेले नाही. ते पत्र या प्रकरणातील संशयित असलेले सनातनचे साधक समीर गायकवाड यांचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी पाठवले आहे.
या पत्रात कोणतीही धमकी नसून त्या मुलाच्या सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली आहे. असे असतांना सदर पत्राचा उल्लेख करून सनातनने मुलाला धमकी दिल्याचा अपप्रचार करून माध्यमांमध्ये सनातन संस्थेची मानहानी करणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या विरोधात सनातन संस्था अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...