आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार कर्मचा-यांच्या DA मध्ये 6 टक्के वाढ, फडणवीस सरकारकडून दिवाळीची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1 जानेवारी 2015 पासून महागाई भत्त्याच्या दरात 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय अर्थ विभागाने आज (15 ऑक्टोबर) निर्गमित केला आहे. दरम्यान, महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ करून फडणवीस सरकारने शासकीय कर्मचा-यांना दिवाळीची भेट दिली आहे.
आता महागाई भत्त्याचा दर 107 टक्के आहे. आता तो 113 टक्के इतका झाला आहे. 1 जानेवारी 2015 पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावर महागाई भत्त्याचा हा दर लागू असेल. 1 ऑक्टोबर 2015 पासून वाढीव महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्यात येईल व 1 जानेवारी 2015 ते 30 सप्टेंबर 2015 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करून एकत्र रक्कम जमा करण्यात येईल असे अर्थविभागाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.