आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कार्यालय हल्ला: संदीप देशपांडेंसह मनसेच्या नऊ जणांना सोमवारपर्यंत कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना हल्ला करण्यास भाग पाडल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. - Divya Marathi
संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना हल्ला करण्यास भाग पाडल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई- मुंबई काँग्रेसचे कार्यालय फोडल्याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह ९ कार्यकर्त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सुरक्षेच्या प्रश्नावरून सर्वांना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती.


फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मनसेविरुद्ध मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील वाद चिघळला आहे. विक्रोळीत फेरीवाल्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. यामुळे मनसे आक्रमक झाली असून त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. कार्यालय  फोडल्याची जबाबदारीही घेतली. त्याबाबतचे ट्विटसुद्धा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले. देशपांडेंसह ९ कार्यकर्त्यांवर दंगा करणे, ट्रेस पासिंग म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेत जबरदस्तीने घुसणे, दुसऱ्यांच्या मालमत्तेची तोडफोड करणे, मुंबई पोलिस कायदा अशा अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंदर्भातील फोटोज व माहिती....

बातम्या आणखी आहेत...