आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sandhya Pawar Transfer From Maharashtra Sadan, New Delhi

ओबामासोबतची मुख्यमंत्र्यांची मेजवानी हुकवणा-या संध्या पवारांची बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-यानिमित्त राष्ट्रपती भवनाने आयोजित केलेल्या स्टेट डिनरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण असून सरकारी बाबूंच्या घोळामुळे जाता आले नव्हते. दरम्यान, निमंत्रण वेळेत मुख्यमंत्र्यांना न पोहचल्याने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील अधिकारी संध्या पवार यांची सरकारने तातडीने बदली केली आहे. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनीही याला दुजोरा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक अाेबामा यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अायाेजित केलेल्या शाही मेजवानीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळेत मिळाले नसल्याने महाराष्ट्र सदनातील सहायक निवासी अायुक्त संध्या पवार यांची बदली करण्यात अाली. निवासी अायुक्त अाभा शुक्ला यांनी त्यांचे पती राजशिष्टाचार अायुक्त लाेकेश चंद्र यांना या प्रकरणातून वाचविण्यासाठी पवार यांचा ‘बळी’ दिल्याची चर्चा अाहे. वर्षभरापूर्वीच महाराष्ट्र सदनात पवार यांना प्रतिनियुक्ती मिळाली हाेती. त्या वित्त विभागात सहसंचालक अाहेत. त्यांचे पती दिल्लीत असल्याने त्यांना दिल्लीला येणे भाग हाेते. परंतु सनदी अधिकारी अापल्या स्वाथार्साठी महाराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांच्या कसा बळी घेतात हे या महाराष्ट्र सदनात गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा अनुभवायला मिळाले अाहे.
माजी निवासी अायुक्त बिपीन मलिक व राजशिष्टाचार अायुक्त लाेकेश चंद्र यांच्या दुर्लक्षामुळे स्नेहभाेजनाचे निमंत्रण मुख्यमंत्री कार्यालयात २३ जानेवारीला प्राप्त झाले. मेजवानीचा कार्यक्रम २५ ला हाेता. परंतु मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी चाैकशीचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्री कायार्लयातील सनदी अधिकारी व महाराष्ट्र सदनातील लाेकेश चंद्र, अाभा शुक्ला व बिपीन मलिक यांच्यावरील आरिष्ट अरिष्ठ या अधिकाऱ्यांनी संगनमत करून संध्या पवार यांच्यावर टाकले. या प्रकरणात पवारच दाेषी असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांची तातडीने बदली करण्यात अाली.