आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप देशपांडेंसह मनसे कार्यकर्त्यांना दंडाधिकारी न्यायालयाने जामीन नाकारला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह इतर सात मनसे कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी फेटाळला. २ दिवसांपूर्वी या ८ जणांना १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या ते मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात अाहेत.  


 मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरीश सोलंकी आणि दिवाकर पडवळ यांच्यावर दंगल माजवणे, विनापरवानगी एखाद्याच्या खासगी मालमत्तेत प्रवेश करणे, मालमत्तेचे नुकसान आणि नासधूस करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले होते.  ‘त्यांनी केलेली कृती ही फेरीवाल्यांबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय राहिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रतिक्रिया होती.  त्यामुळे काही अटी-शर्तींच्या आधारे आपल्या अशिलांना जामीन देण्यात यावा,’ अशी विनंती वकीलाने केली.  मात्र, राजकीय पक्षाचे कार्यालय फोडणे ही सामान्य घटना नसून या प्रकरणी अधिक तपासाची गरज असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...