आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते \'तीन कोटी\' कोल्हापूरमधील बिल्डरचे, बिल्डरला चोरी झाल्याचीच नव्हती माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैैनुद्दीनच्या घरातून जप्त करण्यात आलेली रक्कम... - Divya Marathi
मैैनुद्दीनच्या घरातून जप्त करण्यात आलेली रक्कम...
सांगली/कोल्हापूर- मिरज येथील बेथेलमेहनगर येथील मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 40) याच्या घरात सापडलेली तीन कोटी 11 लाख रूपयांची रक्कम कोल्हापूरातील बिल्डराची असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे आपली 3 कोटीहून अधिक रक्कम चोरीला गेल्याचे खुद्द त्या बिल्डरालाच माहित नव्हते. झुंझार सरनोबत असे त्या कोल्हापूरातील बिल्डरचे नाव आहे. सरनोबत यांनी 28 फेब्रुवारी रोजी वारणानगर येथे राहणारे नातेवाईक गणपत पाटील यांच्या वारणानगरमधील कार्यालयात ठेवली होती.
सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैनुद्दीन मुल्ला याने आपल्या एका साथीदारासह मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कमेवर डल्ला मारला होता. सरनोबत यांची वार्षिक उलाढाल दहा-बारा कोटींची आहे. सरनोबत यांनी ही रक्कम जमिन विकसनासाठी बॅंकेतून काढली होती. मात्र, ती रक्कम नातेवाईकाच्या कार्यालयात ठेवल्यानंतर सरनोबत तिकडे फिरकलेही नाहीत. तसेच आपली रक्कम चोरीला गेल्याचे त्यांना माहितही नव्हते. पोलिसांनी फोन केल्यानंतरच त्यांना याबाबत माहिती कळाली.
शनिवारी मैनुद्दीन विना नंबरच्या बुलेटवरून फिरताना पोलिसांनी संशयाच्या कारणावरून त्याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडे 1 लाखाहून अधिक रोख रक्कम आढळून आली. त्याकडे पैशाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी करून त्याच्या घरी झाडाझडती घेतली असता तीन कोटीहून अधिक रक्कम आढळून आली.
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने कर्नाटकातील खासदाराच्या गाडीतून रक्कम चोरल्याचे सांगितले. तिकडे पोलिसांनी या परिसरातील दोन खासदारांना तुमची रक्कम चोरीला गेली आहे का याची विचारपूस केली. मात्र, त्या खासदारांनी आपली काहीही रक्कम चोरीला गेली नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मैनुद्दीनला रिमांड देताच त्याने वारणानगरमधील शिक्षक कॉलनीतील कार्यालयातून चोरल्याचे सांगितले.
पोलिसांनी वारणानगरची शिक्षक कॉलनी गाठली व माहिती घेतली. त्यावेळी ही रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले गेले. मात्र, रक्कमेचे मालक झुंझार सरनोबत हे कोल्हापूर शहरात होते. त्यांना पोलिसांनी तुमची रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले. त्यावेळी मला काहीही माहिती नाही. त्यानंतर सरनोबत वारणानगरला पोहचले व ती रक्कम आपलीच असल्याचे सांगितले.
पुढे वाचा, इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नजर वळली आता बिल्डर झुंझार सरनोबत यांच्याकडे... मागवली माहिती पैशाचा स्त्रोताबाबत.....
बातम्या आणखी आहेत...