आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ अाॅलिम्पिकमध्ये पदक, ही स्वप्नपूर्ती!, जगातील अव्वल सानियाचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुढच्या वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये जर पदक जिंकण्यात यश िमळाले तर ती माझ्यासाठी स्वप्नपूर्ती असेल; पण जर का िमळाले नाही तर तो काही माझ्या दृष्टीने विश्वाचा अंत ठरणार नाही, असे ख्यातीनुसार रोखठोक मत भारताची महिला टेनिस स्टार सानिया िमर्झाने व्यक्त केले. सानिया व फुटबाॅलपटू सुनील छेत्री यांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला हाेता. याप्रसंगी सानिया बोलत होती.

ती एक आशा आहे. जर मी आणि लिएंडर पेसने िमश्र दुहेरीत पदक जिंकले तर ते स्वप्न प्रत्यक्षात साकारल्यासारखेच असेल. मात्र जर का िरक्त हस्ते परतलो तर आमचे आयुष्य आहे तसेच सुरू राहील, असे जागतिक महिला दुहेरी टेनिसमधील अग्रमानांकित टेनिसपटूने स्पष्ट केले.

१९९६ च्या अटलांटा आॅलिम्पिकमध्ये लिएंडर पेसने कांस्यपदक जिंकले होते. जर त्याने रिओमध्ये सानिया मिर्झाच्या जोडीने मिश्र दुहेरीत भाग घेतला तर भारताला क्रीडा महाकुंभात टेनिसमध्ये दुसरे पदक मिळू शकते, असी आशा माजी डेव्हिस चषक टेनिसपटू रमेश कृष्णन यांनी नुकतीच व्यक्त केली होती. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना सानिया उत्तर देत होती.

सिंगापूर येथे डब्ल्यूटीए स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या इंडो-स्विस जाेडीने इंडियन वेल्स, मियामी, कार्लस्टन, विम्बल्डन, अमेरिकन ओपन, ग्वांगझू, वुहान आणि बीजिंग येथील स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावले.

सानियाचा सलग २२ वा विजय
सानिया-मार्टिना हिंगीस जोडीने यंदाच्या मोसमात महिला दुहेरीत सलग २२ विजयांची नोंद करून ९ वे विजेतेपद पटकावले. या दोघींचाही खेळ दिवसेंदिवस बहरात चालला आहे. सािनया तर खरेच अप्रतिम खेळत आहे, अशा शब्दांत महान महिला टेिनसपटू मार्टिना नवराितलोवाने स्तुतिसुमने उधळणारा ट्विट केला आहे.