आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanitation News In Marathi, Narendra Modi, Prime Minister, Divya Marathi

मुलींच्या शौचालयांसाठी 200 कोटी रुपयांच्या भरीव देणग्यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी घोषित केलेल्या ‘क्लीन इंडिया’ मोहिमेला टीसीएस दोन कॉर्पोरेट घराण्यांनी प्रतिसाद दिला आहे. टीसीएस व भारती एंटरप्राइझेसशी निगडित भारती फाउंडेशनने प्रत्येकी 100-100 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केली आहे. टीसीएस देशभरातील 10 हजार शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी 100 कोटी रुपयांची देणगी देणार आहे. भारती फाउंडेशन पातियाळाच्या ग्रामीण भागांत स्वच्छतागृहे उभारण्यासाठी तीन वर्षांत 100 कोटी रुपयांचे योगदान देणार आहे. भारतीय फाउंडेशन सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एंटरप्राइझेजस समूहाची शाखा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी ‘क्लीन इंडिया’ मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी सीएसआर निधीचा वापर करावा, असे आवाहनही मोदी यांनी केले होते. त्याला दोन कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

100 कोटी रुपये टीसीएसची देणगी
10,000 शाळांमध्ये या निधीतून विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत.

शैक्षणिक कामगिरी उंचावेल
मोदी यांनी पुढाकार घेऊन ‘क्लीन इंडिया’ मोहिमेची घोषणा केली आहे. त्यासाठी टीसीएस ही देणगी देणार आहे. या निधीमुळे शैक्षणिक कामगिरी उंचावण्याच्या पातळीवर मूर्त परिणाम होईल.
- एन. चंद्रशेखर, सीईओ व एमडी, टीसीएस.

सहा नववधू माहेरी परतल्या!
० उत्तर प्रदेशात सहा नववधू सासरी स्वच्छतागृह नसल्याने माहेरी परतल्या आहेत. महिलांसाठी प्रत्येक गावांत, प्रत्येक घरी स्वच्छतागृह असावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 68 व्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात म्हटले होते. याची आठवण या नववधूंनी करून दिली. खेसिया गावात हा प्रकार घडला.