आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt Appeals For Increase In Time Limit To Surrender

शरणागतीसाठी संजय दत्तने मागितली 180 दिवसांची मुदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मुंबई बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी शिक्षा ठोठावण्‍यात आलेला अभिनेता संजय दत्तने शरणागतीसाठी आणखी वेळ मागितला आहे. संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा झाली असून त्‍यापैकी त्‍याने 18 महिने तुरुंगात काढले आहेत. उर्वरित शिक्षा भोगण्‍यासाठी त्‍याला 18 एप्रिलपर्यंत शरण येण्‍याची मुदत दिली होती. त्‍यानंतर आता त्‍याने मुदत वाढविण्‍याची विनंती सर्वोच्‍च न्‍यायालयाला केली आहे. शरण येण्‍यासाठी संजय दत्तने 180 दिवसांची मुदत मागितली आहे.

संजय दत्त काही चित्रपटांमध्‍ये काम करीत आहे. या चित्रपटांचे चित्रिकरण 18 एप्रिलच्‍या आत पूर्ण करण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न होता. परंतु, ते शक्‍य झाले नाही. त्‍यामुळे त्‍याने आज सर्वोच्‍च न्‍यायालयात अर्ज दाखल केला. त्‍याने न्‍यायालयाकडे शरणागतीसाठी काही आठवडे आणखी मागितले आहे. त्‍याच्‍या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. याचिका फेटाळल्‍यास त्‍याला 18 तारखेलाच शरण यावे लागणार आहे.