आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिर खानने घेतली संजयची भेट; संजूच्या कुटुंबियांची सलमान-अजय घेणार काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता संजय दत्तने पुढील महिन्यात तुरुंगात जाण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आजपासून तो आपल्या चित्रपटाचे शुटिंगसाठी पूर्ण करण्यासाठी सेटवर दाखल झाला आहे. संजूबाबाने गुरुवारी एक पत्रकार परिषद घेऊन आपण माफीसाठी अर्ज करणार नसल्याचे सांगत शिक्षा भोगण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. तसेच माझे देशावर प्रचंड प्रेम असून, कोर्टाच्या निर्णयाचाही आपण आदर करीत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, संजूबाबाच्या भेटीला बॉलिवूडमधील कलाकारांची रांग लागली असून, आज सकाळीच अभिनेता आमिर खानने त्याची भेट घेतली.

दरम्यान, संजूबाबा पुढील महिन्यात तुरुंगात जाणार असल्याने त्याला आपल्या कुटुंबियांची काळजी वाटत आहे. त्यासाठी त्याने आपल्या जवळच्या मित्रांना मदत करण्याची विनंती केली आहे. संजूबाबाचे बॉलिवूडमधील सलमान खान व अजय देवगण जिगरी आहेत. त्यातही सलमानशी त्याची जवळीक जास्त आहे. ( RARE UNSEEN PHOTOS: सलमान आणि संजयच्या 'यारी-दोस्ती'ची एक झलक) त्यामुळे त्याने सल्लू व अजयशी मान्यता व आपल्या तीन मुलांची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच आपण कोणत्याही स्थितीत मदत करु, असे आश्वासन आपल्या मित्रांना या जोडीने दिले आहे. संजय दत्तला आपली पत्नी व मुलांबरोबरच त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचीही चिंता सतावत आहे. कारण तो तुरुंगात गेल्यानंतर त्याकडे कोण लक्ष देईल, असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. मान्यताला प्रॉडक्शन हाऊसबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे ती स्वत:च्या जिवावर ते हाऊस चालवू शकणार नसल्याची कल्पना संजूबाबाला आहे. त्यामुळेच सलमान व अजयशी या बाबतही चर्चा केली असल्याचे कळते. या चर्चेदरम्यान त्याच्यासोबत मान्यताही उपस्थित होती. तसेच सलमान व अजयने त्याच्या बॅनरखाली बनणा-या चित्रपटात काम करण्याचा शब्दही संजयला दिला आहे.