आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या वर्तणुकीमुळे संजय दत्तची शिक्षा कमी; राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्राव्दारे हायकोर्टात स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- संजय दत्त याच्याबाबत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसून, त्याला जेलमध्ये दिलेली कामे त्याने वेळेत पूर्ण केलीत. त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळेच त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राव्दारे हायकोर्टात स्पष्ट केले आहे.
 
राज्य सरकारच्या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह
राज्य सरकारच्या या स्पष्टीकरणाला सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी विरोध केला आहे. अशी कोणती कामे आहेत जी संजय दत्तने वेळेत पूर्ण केली आहेत? त्याची कोणती चांगली वागणूक होती ज्यामुळे त्याची शिक्षा कमी केली? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारच्या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
 
पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी
संजय दत्तची अशी कोणती चांगली वागणूक आहे ते न्यायालयाला तरी कळू द्या असा प्रश्न विचारुन न्यायालयाने राज्य सरकार आणि जेल प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी ठेवली आहे.
बातम्या आणखी आहेत...