आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळल्याने सुप्रीम कोर्टाने अभिनेता संजय दत्तला 5 वर्षासाठी तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे. या केस प्रकरणात संजय दत्त आरोपी क्रमांक 117 होता. संजय दत्तने मुंबई चे डीसीपी (झोन- ३) कृष्णलाल बिश्नोई यांच्यासमोर या प्रकरणी आपला कबुली जवाब दिला होता. हा कबुली जवाब संजयने 26 एप्रिल, 1993 रोजी दुपारी साडेतीन वाजता (पहिला भाग) आणि 28 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता (दुसरा भाग) दिला होता.
या कबुली जवाबामध्ये संजयने मान्य केले होते की, त्याने दुबईत दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती. तसेच अबू सालेमने त्याला एके 56 रायफल दिल्याचे सांगितले. वाचा, 1993 ला संजय दत्तने काय दिला कबुली जवाब....
1- माझ्याजवळ तीन शस्त्रे पाळण्याचा परवाना आहे. ब्रुनों ब्रांड रायफल 270, 375 मॅग्नम डबल बॅरल्ड रायफल आणि डबल बॅरलची 12 बोर गन याचे परवाने आहेत.
2- मला शिकारीचा छंद असल्यामुळे मी तीन शस्त्रे खरेदी केली होती. मी नेहमी आपला मित्र युसूफ नलवालासोबत शिकारीला जात होतो. कारण तो एक अनुभवी शिकारी आहे. मी युसूफचा मित्र केसरी बापूजी अदाजेनियाला ओळखतो तसेच त्याला तीन वेळा भेटलो आहे.
3- डिसेंबर 1991 मध्ये मी अभिनेता व प्रोडयूसर फ़िरोज खानचा चित्रपट 'यलगार'च्या शुटिंगसाठी डेट्स दिल्या होत्या. तो शुटिंगसाठी संपूर्ण यूनिट दुबईला घेऊन गेला. शूटिंगच्या दरम्यान त्याने मला दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनीसला भेटवले. त्यानंतर शूटिंगच्या काळात अनीस मला भेटायला यायचा. त्यामुळे मी त्याच्याशी चांगलाच परिचित झालो.
हा कबुलीजवाब पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी कोर्टात तसाच्या तसा कोर्टात सादर केला होता. त्यामुळेच त्याला शिक्षा होण्यास मदत झाली. पुढे आणखी वाचा, संजयने पोलिसांपुढे काय-काय कबुली जवाब दिला होता.... क्लिक करा...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.