आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Dutt Could Not Sleep Whole Night After Verdict On 1993 Mumbai Bomb Blasts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय दत्तने जागून काढली गुरुवारची रात्र, शिक्षा जाहीर झाल्‍यानंतर गेला होता देवघरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चित्रपट अभिनेता संजय दत्तला सर्वोच्‍च न्‍यायालयाने 5 वर्षांची शिक्षा ठोठावल्‍यानंतर प्रेस काऊंसिलचे अध्‍यक्ष मार्कंडेय काटजू यांनी त्‍याची बाजू घेतली. त्‍याला माफ करावे, असे काटजू म्‍हणाले. परंतु, वेळ कमी असल्‍याची जाणीव संजय दत्तला झालेली आहे. अपूर्ण चित्रपटांच्‍या शुटींगचे काम पूर्ण करण्‍यासाठी तो कामाला लागला आहे. मात्र, शिक्षा ठोठावण्‍यात आल्‍यानंतर गुरुवारची रात्र त्‍याच्‍यासाठी अतिशय अवघड गेली. तो रात्रभर झोपू शकला नाही. रात्री उशीरापर्यंत तो लोकांना भेटत होता. वकीलांशीही त्‍याने चर्चा केली.

मुंबई 1993 मध्‍ये झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी गुरुवारी सर्वोच्‍च न्‍यायालयाने शिक्षा ठोठावली त्‍यावेळेस संजय दत्त मुंबईत घरीच होता. गुरुवारचे शुटींग त्‍याने आधीच रद्द केले होते. ज्‍या क्षणी निर्णय घोषित झाला, त्‍यावेळी तो कोसळलाच. त्‍याच्‍या डोळ्यातून पाणी आले. तो लगेच देवघरात गेला. काही वेळ एकटाच तिथे बसला. त्‍यानंतर रात्री प्रसारमाध्‍यमांसमोर आला. त्‍यावेळी बोलतानाही तो अतिशय भावूक झाला होता.