आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजूबाबाला पॅरोलमध्ये हवी आणखी 30 दिवसांची वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पत्नी मान्यताच्या उपचारासाठी आधीच दोन महिन्यांपासून तुरुंगाबाहेर असलेला मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व अभिनेता संजय दत्त याने पुन्हा 30 दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला आहे. या वेळी त्याने पत्नी व मुलांच्या देखभालीचे कारण देत पुणे विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एक महिन्याच्या पॅरोलवर त्याला मंजूर झाला होता.

काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्याला पुन्हा 21 डिसेंबर रोजी 30 दिवसांची सुटी मंजूर करण्यात आली. त्यानंतर मान्यताच्या आजारपणाचे कारण दिल्याने त्याला 21 जानेवारीला आणखी एकदा महिन्याचा पॅरोल देण्यात आला. त्यामुळे तो तीन महिन्यांपासून तुरुंगाबाहेरच आहे. पुणे विभागीय आयुक्तालयातील कर्मचारी संजय व मान्यताची चौकशी करतील. त्यानंतर त्याच्या अर्जावर विचार करण्यात येईल, असे खार पोलिसांनी सांगितले. संजयला पॅरोल मंजूर केल्याने शिवसेना, भाजपसह अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.