आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- परवाना नसतानाही शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी व मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींशी संबंध असल्याच्या आरोपात दोषी आढळलेल्या संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. असे असले तरी संजय दत्तची शिक्षा माफ करावी, यासाठी संपूर्ण देशात चर्चा घडत आहे. अनेक राजकीय पक्षांनी याबाबत स्पष्ट व उघड घेतली आहे. संजय दत्तची वकिली करणा-या लोकांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात माजी न्यायाधिश राहिलेले मार्कंडेय काटजूपासून काँग्रेसच्या दिग्विजय सिंगांपर्यंत ही मजल गेली आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व खुद्द सत्ताधारी काँग्रेस पक्षानेही संजयच्या शिक्षेचा विचार व्हावा, अशी भूमिका घेतली आहे. पण खरंच ही भूमिका घेणे योग्य आहे?, संजय खरंच निर्दोष आहे का? की त्याला झालेली शिक्षा बरोबर आहे की कमी?. मुंबई पोलिस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला झालेली शिक्षा ही इतर सामान्य गुन्हेगारांपेक्षा कमी झालेली आहे. तसेच त्याला कमीत कमी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संजयला माफी द्यावी अशी मागणी करणा-यांचे म्हणणे आहे की, संजय दत्त काही दहशतवादी नाही. त्याने जे काही केले आहे ते भावनेच्या भरात व मित्रत्त्वाच्या नात्यातून केले आहे व त्यातच तो फसला गेला आहे. असे असले तरी त्याची शिक्षा कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण कोर्टात हा पुरावा सादर झाला आहे की, 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतरही संजय दत्त अंडरवर्ल्डच्या लोकांच्या संपर्कात होता. हा दावा खुद्द मुंबई पोलिस करीत होती व आजही करीत आहे. त्यामुळे बॉम्बस्फोट झाल्यानंतर सात वर्षांनंतरही संजय दत्तचे अंडरवर्ल्डशी संपर्कात होता, हे स्पष्ट झाले आहे.
14 नोव्हेंबर 2000 रोजी मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलशी बोलताना व चित्रपट क्षेत्रातील चार व्यक्तींच्या बाबतीत बोलताना संजय दत्तचे बोलणे रिकॉर्ड केले होते. या चार हस्तींबाबत संजय दत्त छोटा शकीलशी बोलताना आढळून आले आहे. या संभाषणात संजय दत्तने गोविंदा, करिश्मा कपूर, प्रीती झिंटा आणि सलमान खान यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. 2001 साली आलेल्या 'चोरी चोरी चुपके चुपके' या सलमान खान व प्रिती झिंटा यांच्या चित्रपटात अंडरवर्ल्डने पैसा गुंतवल्याचे पुढे आले होते.
मुंबई पुलिसांनी सन 2000 मध्ये 27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरच्या काळात 32 वेळा चित्रपट निर्माता भरत शाह आणि छोटा शकील यांच्यातील फोन संभाषण टॅप करुन रिकॉर्डिंग केले आहे. पोलिस त्यावेळी भरत शाहचे दाऊदशी असलेले संबंध याची पडताळणी करीत होते.
'भाई, मैंने आपले लिए एक टी-शर्ट खरीदी है'. वाचा पुढे...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.