आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutta News In Marathi, Parol, Prison, Divya Marathi

पॅरोल संपला; अखेर संजूबाबा तुरुंगात परतला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / ठाणे - अभिनेता संजय दत्तच्या वाढीव पॅरोलची मुदत संपल्याने तो शनिवारी तुरुंगात परतला. पॅरोल वाढवल्याच्या मुद्द्यावरून त्याच्यासह राज्य सरकारवरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
संजय दत्त 21 डिसेंबर रोजी पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर त्याला दोन वेळा सरकारकडून पॅरोलमध्ये वाढ मिळाली.

पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे त्याला ही सुटी मंजूर करण्यात आली होती. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त सध्या शिक्षा भोगत आहे. याआधी संजूबाबाला 15 दिवसांची फर्लो रजाही मिळाली होती. त्या वेळीही त्याने वैद्यकीय कारणांमुळे त्यात वाढ करून घेतली होती.