आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt's Increase Punishment Of Film Actor Sanjay Datta

अभिनेता संजय दत्तची शिक्षा 4 दिवसांनी वाढणार, पोलिस, अधिका-यांवरही कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सिने अभिनेता संजय दत्तच्या फर्लो रजेच्या घोळाबाबत कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संजय दत्तची शिक्षा 4 दिवसांनी वाढवण्यात येणार असून या प्रकरणाशी संबंध असलेल्या पोलिस तसेच तुरुंग अधिका-यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी घेतला आहे.
संजय दत्तच्या फर्लो रजेच्या घोळामुळे राज्य सरकारची बदनामी झाली होती. पोलिस तसेच तुरुंग विभागाने एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देणा-या शिंदे यांनी दिले होते. संजय दत्तची पॅरोलवरील रजा ८ जानेवारीला संपत असल्याने त्याने सूर्यास्ताआधी तुरुंगात हजर राहणे अपेक्षित होते. तो हजर राहण्यासाठी गेला असता त्याची अधिकची १४ दिवसांची फर्लो रजा मंजूर होणे बाकी असल्याचे त्याला सांगण्यात आले. विशेष म्हणजे फर्लो रजेबाबत स्पष्टता नसल्याने त्याला तुरुंगात घेतले गेले नाही. पोलिस व तुरुंग अधिकाऱ्यांच्या घोळाचा फायदा संजय दत्तला मिळाला. दोन दिवसांनी त्यांची बाकीची रजा नामंजूर झाल्याने तो पुन्हा तुरुंगात गेला. तरी त्यामुळे एकूणच सरकारला आपल्याच नियमांबाबत माहिती नसल्याने हा विषय चर्चेला झाला.

कायद्यातील तरतूद आणि नंतर सरकारच्या मुख्य गृहसचिवांनी काढलेले परीपत्रक यातील फरकामुळे संजय दत्तच्या फर्लो रजेच्या अर्जावर वेळेत निर्णय घेतला गेला नाही. यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश आपण दिले होते. ही चौकशी आता पूर्ण झाली असून आपल्या हाती अहवाल आला आहे. या प्रकरणी अधिका-यांवर अाठ दिवसांत कारवाई होणार असल्या शिंदे यांनी स्पष्ट केले.

रजेचा अर्ज पोस्टाने पाठवला
संजय दत्तने केलेल्या वाढीव रजेचा अर्ज संबंिधत अधिकाऱ्याने पोलिस िरपोर्ट घेण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे आणि तुरुंग महानिरीक्षकांकडे पाठवायचा होता. मात्र महत्वाचा असा हा अर्ज इंटरनेटच्या माध्यमातून पाठवण्याची संधी असतानाही तो पोस्टाने पाठवला गेला. त्यामुळे पुढचा घोळ झाला, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
जेल मॅन्युएलमध्ये सुधारणा-
हा साऱ्या प्रकाराला जेल मॅन्युएलमधील त्रुटी कारणीभूत असल्याचे अहवालात नोंद करण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या त्रुटी दूर करण्यात येतील. गेली अनेक वर्षे जेल मॅन्युएलमधील त्रुटींचा फायदा घेऊन आरोपी मोकाट सुटत होते. मात्र यापुढे तसे होणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.