आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी-संजय जोशी पोस्टरयुद्ध मुंबईतही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि संघाचे प्रचारक संजय जोशी यांच्यातील पोस्टरयुद्ध गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेशपाठोपाठ आज मुंबईतही पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबई भाजपची मात्र भलतीच पंचाईत झाली आहे. एका रात्रीत उभारण्यात आलेल्या या फलकांविषयी पत्रकारांनी विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेली.
नरिमन पॉइंट येथील प्रदेश भाजप कार्यालय, दादर येथील मुंबई भाजप कार्यालय, मंत्रालयाच्या समोर, आझाद मैदान, सीएसटी स्टेशन, प्रेस क्लब, जे. जे. उड्डाणपूल, लालबाग बसस्टॉप अशा मोक्याच्या ठिकाणी जोशी समर्थकांनी हे पोस्टर्स लावले आहेत. ‘बीजेपी तुम्हारी माँ है, संघ तुम्हारा बाप. संजय जोशी तेरीही दाल गलेगी. . . एक बार फिर से संजय जोशी दिल से' असा मजकूर त्यावर लिहिला होता. राज्याच्या उद्यापासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाची वेळ साधून ही फलकबाजी झाल्याने भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
मोदी आणि जोशी यांच्यातील वितुष्ट नवीन नाही. जोशी यांनी गेली अनेक वर्षेे संघाचे प्रचारक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी गुजरातचे प्रभारी म्हणून काम करताना मोदी व त्यांच्यात प्रचंड मतभेद झाले होते. मोदी यांच्या वाटेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्नही जोशी यांनी केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री झालेल्या मोदी यांनी मे महिन्यामध्ये मुंबईत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने जोशी यांना चांगलेच कोंडीत पकडले. जोशी कार्यकारिणीच्या बैठकीला येणार असतील तर आपण त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी धमकी मोदींनी दिली होती. त्याची धास्ती घेऊन गडकरींनी जोशींचा राजीनामा घेतला.
भाजपमागे साडेसाती- देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या मागे गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत साडेसाती लागली आहे. कर्नाटकातील येडीयुरुप्पाची मनमानी, महाराष्ट्रात मुंडे- गडकरी शीतयुद्ध यापाठोपाठ आता मोदी-जोशी वादही भडकल्याने अडचणी वाढत आहेत.
PHOTOS : पोस्टरवॉर सुरुच : मोदींचा पुन्हा अपमान, आणखी एक पोस्टर