आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Kenekar Appointed As State Bjp Workers Morcha President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप कामगार मोर्चाच्या अध्यक्षपदी केणेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रदेश भाजपने 2013-2015 या कालावधीसाठी विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची घोषणा गुरुवारी केली. यात महिला मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी स्मिता वाघ, तर कामगार मोर्चाच्या अध्यक्षपदी औरंगाबादचे संजय केणेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

विविध आघाड्यांच्या अध्यक्ष, प्रमुखांची नावे : अनुसूचित जाती मोर्चा - आमदार नानाजी शामकुळे, अनुसूचित जमाती मोर्चा - अशोक नेते, शेतकरी आघाडी - ज्ञानोबा मुंडे (अध्यक्ष), प्रशांत इंगळे (सरचिटणीस), उत्तर भारतीय मोर्चा- आर. डी. यादव, मनपा/ न.पा. मोर्चा- विजय साने, जिल्हा परिषद, पंचायत समिती मोर्चा - रमेश मानकर, कामगार मोर्चा- संजय केणेकर, कायदा सेल- अ‍ॅड. अनिल सिंग (अध्यक्ष), अ‍ॅड. उदय डबले (सरचिटणीस), साहित्य प्रकाशन सेल- गणेश हाके, प्रशिक्षण सेल- किरण पातुरकर, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल - लखन भतवाल (संयोजक), अपंग सेल- राजेंद्र पुरोहित (संयोजक), मच्छीमार सेल - राजन मेहर (संयोजक), क्रीडा सेल- राणी द्विवेदी (संयोजक, कांदिवली), इंजिनिअर प्रकोष्ठ : योगेश कासार (संयोजक), उद्योग आघाडी- श्रीराम दांडेकर (अध्यक्ष), निवडणूक सेल - राजीव पांडे (अध्यक्ष), सांस्कृतिक सेल- विसुभाऊ बापट (संयोजक), व्यापार आघाडी- कंवरलाल संघवी (संयोजक), इकॉनॉमिक सेल (फायनान्स) - उत्तम अग्रवाल (संयोजक), संवाद सेल- आशुतोष पाटणकर.