आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणांना विरोध कायम ठेवल्याने संजय खोडकेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा-कौर यांच्या विरोधात भूमिका घेणारे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी ही घोषणा केली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर खोडकेंचे एकछत्री वर्चस्व होते. त्यामुळे आता राणा यांच्या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात संजय खोडके यांच्या गटाचे मोठे वर्चस्व आहे. खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके यांना पराभूत करून रवी राणा हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राणा यांनी राष्ट्रवादीशी दोस्ती केली. मात्र, खोडके आणि राणा यांच्यात वैर कायम होते. त्यात नवनीत राणा कौर यांना उमेदवारी मिळाल्याने खोडके काही दिवसांपासून नाराज होते. नवनीत राणा यांचा प्रचार न करण्याची ठाम भूमिकाही खोडके गटाने घेतली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी खोडके गटातील कार्यकर्त्यांवर कारवाई करूनही खोडकेंचा पवित्रा कायम होता. त्यामुळे पक्षाने ही कारवाई केली.