आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'पद्‍मावती\'साठी संजय भंसाळींचा उद्धव ठाकरेंना फोन; शिवसेनेची भूमिका मात्र अस्पष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोठ्या समाजाची भावना दुखावत असेल तर त्यांच्याशी थेट चर्चा केली पाहिजे, या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्माता दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांना सांगितले.

तसेच राणी पद्मावती ही सर्व हिंदूसाठी आदर्श आहे. अशावेळी या समाजातील सर्व नेत्यांनी सर्व प्रथम आधी सिनेमा पहावा आणि नंतर चित्रपटाला विरोध करावा असे सांगत चित्रपटाबाबत शिवसेनेची भूमिका मात्र स्पष्ट केली नाही.

 

राणी पद्मिनीचे चरित्र चुकीच्या पद्धतीने पडद्यावर दाखवल्याचा आरोप करीत देशभरातील राजपूत आणि हिंदू संघटनांनी संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावतीला विरोध केला आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. या पार्श्वभूीवर संजय लीला भंसाळी यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... उद्धव ठाकरे यांनी या शब्दात भंसाळींना सुनावले...

बातम्या आणखी आहेत...