आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Nirupam News In Marathi, Congress, EVM, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाजनांच्या कंपनीत ‘ईव्हीएम’मध्ये भाजपला अनुकूल बदल ,संजय निरुपम यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ९० हजार ईव्हीएम मशीनची छेडछाड होऊ शकते, त्यामुळे या मशीनचे परिरक्षण (मेंटेनन्स) आणि दुरुस्ती उमेदवारांची नावे घोषित होण्यापूर्वी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे सचिव, माजी खासदार संजय निरुपम यांनी मंगळवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या मुलाच्या कंपनीत ईव्हीएमची दुरुस्ती होत असून त्यात भाजपला अनुकूल असे बदल केले जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

‘ईव्हीएम यंत्रांची निर्मिती ही भारत सरकारच्या मालकीच्या कंपन्यांद्वारे केली जाते. यात काहीही गडबड होत नाही. नंतर हे यंत्र संबंधित राज्याकडे दिले जातात. तेथेही काही गडबड होत नाही. मात्र, मतदानापूर्वी हे यंत्र जेव्हा खासगी कंपन्यांकडे दुरुस्तीसाठी जातात तेथे गडबड केली जाते. २००७ आणि २०१२ मध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक भाजपने जिंकली तेव्हा ईव्हीएम यंत्रांचे मेंटेनन्स गुजरातमध्ये महाजन यांच्या मुलाच्या कंपनीत करण्यात आले होते. तसेच छत्तीसगड आणि राजस्थानमधील निवडणुकीसाठीही याच कंपनीत दुरुस्ती झालेले ईव्हीएम वापरण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला अनुकूल ठरतील, असे बदल या मशीनच्या चीपमध्ये करण्यात आले होते,’ असा आरोप निरुपम यांनी केला.

व्हीव्ही पॅट यंत्रणा बसविण्याची मागणी
ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते, हे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मान्य केले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्ही पॅट यंत्रणा बसवावी. जेणेकरून मतदाराला आपण कुणाला मतदान केले ते समजेल, असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्याची विधानसभा निवडणुकीत किती प्रमाणात अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी विचारणा निरुपम यांनी निवडणूक अधिका-यांकडे केली आहे.

गैरव्यवहार होऊ नये
उमेदवार घोषित झाल्यानंतर मशीनची दुरुस्ती केल्यास त्यामध्ये प्रोग्राम बसवला जाऊ शकतो. तसे झाल्यास एका ठरावीक उमेदवाराच्या बाजूने गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे ईव्हीएम मशीनद्वारे कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी सर्व मशीनमध्ये व्हीव्ही पॅट यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

आधी भाजप, आता काँग्रेस नेत्यांकडून तक्रारी वाढल्या
२००९ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांना अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारी यंत्रणा हाताशी धरून ईव्हीएम मशिनमध्ये गडबडी करून विजय मिळविल्याचा आरोप भाजपचे तत्कालिन पराभूत उमेदवार किरीट सोमय्या यांनी केला होता. इतकेच नव्हे तर ‘ईव्हीएम’च्या तंत्रज्ञानात हवे तसे बदल करता येत असल्याचेही पत्रकार व निवडणूक अधिका-यासमोर सिद्ध करून दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सत्ताधारी काँग्रेसने तेव्हा या आरोपाचे खंडन केले होते. आता हेच भाजपवाले केंद्रात सत्तेवर आल्याने काँग्रेसकडून अशा तक्रारी होत आहेत.

व्हीव्ही पॅट म्हणजे काय?
व्होटर्स व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेलर ही यंत्रणा ईव्हीएम मशीनमध्ये बसवली जाते. या यंत्रणेमुळे मतदाराला आपण कोणाला मतदान केले आहे हे स्लीपद्वारे दिसेल. त्यामुळे आपण केलेले मतदान योग्य उमेदवारास मिळाले की नाही, हे मतदाराला समजेल. राज्यातील विधानसभा निवडणुकीत केवळ १३ मतदारसंघांत या वेळी अशी मतदानानंतर पावतीची साेय उपलब्ध करून देण्यात आली आहे.