आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामत यांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश, काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या मनमानीला कंटाळून थेट काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांची मनधरणी करण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. कामतांच्या काही अटी मानण्यास सोनिया गांधींनी होकार दिला

असून लवकरच मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदल झालेेले दिसतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतर गुरुदास कामत प्रथमच मुंबईकरांसमोर आले. शनिवारी सकाळी आपल्या अंधेरीच्या कार्यालयात पोहचलेल्या कामतांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. विशेष म्हणचे त्यांनी प्रसार माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही किंवा ‘ऑफ द रेकॉर्ड’ पण पत्रकारांना भेटणार नाही, अशी भूमिका घेतली. खरेतर कामत हे कधीच फोनवर उपलब्ध नसतात किंवा त्यांना मेसेज पाठवल्यानंतर ते उत्तरही देत नाहीत. त्यांच्या राजकीय संन्यासाच्या निर्णयाचा प्रसार माध्यमांनी चांगलाच समाचार घेतल्याने अाधीच प्रेसपासून दूर राहणारे कामत आणखी लांब गेल्याचे दिसून आले.

कामत यांना भेटण्यासाठी मुंबईतील काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजहंस सिंग, चंद्रकांत हंडोरे, राजन सिंह, निजामुद्दीन रायन, अमरजित सिंग मनहास, बलदेवसिंह खोसा हजर होते. याशिवाय पदाधिकारी व कार्यकर्तेही खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही गर्दी पाहता आगामी मुंबई महापािलका निवडणुकीच्या तोंडावर कामत यांचा संन्यास काँग्रेसला परवडणार नाही, हे दिसून आले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची कामत यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत कामतांनी संजय निरूपम यांची हुकूमशाही तसेच काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची पक्षातील ढवळाढवळ याविषयी माहीती दिली. यावर मार्ग काढताना सोनियांनी अहमद पटेल व ए.के.अँथोनी यांना कामत यांच्याशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. चर्चेनंतर कामत हे मुंबईला परतले असून येथे येताच त्यांनी आपल्या समर्थकांची भेट घेतली.

शिवसेनेतून आलेले निरूपम व जनता दलातून प्रवेश केलेले मोहन प्रकाश हे काँग्रेस निष्ठावंतांच्या भावना समजू शकत नाहीत. यामुळेच त्यांनी निष्ठावंतांना डावलून मुंबई काँग्रेस वाॅर्ड अध्यक्षपदांची नियुक्ती करताना मनमानी केली. याचबरोबर मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते असलेले प्रवीण छेडा हे विश्वासू नसून त्यां नाही बदलण्याची गरज आहे. निरूपम, मोहन प्रकाश, छेडा, वाॅर्ड अध्यक्षपदाच्या फेरनियुक्त्या न केल्यास मला काँग्रेसमध्ये नेता म्हणूून राहण्यात अजिबात रस नाही. मी एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून राहिन, अशा भावना कामत यांनी अहमद पटेल व अॅन्थोनी यांच्याकडे व्यक्त केल्या.
कामत यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणे पक्षश्रेष्ठीला शक्य नसले तरी त्यांच्या काही मतांचा हा निश्चितच विचार केला जाईल, असे दिसते. पुढील आठवड्यात मुंबई
काँग्रेसमध्ये फेरबदल झालेले दिसतील, असे सूत्रांनी सांगितले.

बंडखोरीने काँग्रेसच्या २५ जागा येणार नाहीत
मुंबई काँग्रेसमधील बंडाची दखल न घेतल्यास मुंबई महापािलकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या २५ जागाही येणार नाहीत. विरोधक काँग्रेसचा पराभव करणार नाहीत, तर काँग्रेसकडून काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यात येईल आणि सध्याच्या ५२ जागांवरून निम्म्यावर नगरसेवक कमी होतील, अशी वस्तुिस्थती कामतांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडल्याचे समजते.
बातम्या आणखी आहेत...