संजय पुनामिया : उद्योजक, निर्माता
वय- अंदाजे ४० वर्षे
चर्चेत का? - त्यांच्याच भागीदाराने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे.
तीन वर्षांपूर्वीची घटना. कुवेतच्या शाही कुटुंबाने भारताशी राजनयिक संबंध तोडण्याची धमकी दिली होती. ही धमकी मुंबईच्या एका फ्लॅटवर संजय यांनी मालकीचा दावा केल्यानंतर दिली गेली. मरिन ड्राइव्हवर अल-सबाह इमारत आहे. त्यात सी-फेसिंग फ्लॅट कुवेतच्या शाही परिवाराच्या मालकीचा आहे. कुवेतच्या अमिराची मुलगी शेखा फदयाह साद अल सबाहने भारतातील तत्कालीन कुवेती राजदूत सामी मोहंमद अल सुलेमान यांना याविषयी लिहिले होते. ही पूर्ण इमारत तसेच तिच्याजवळील ‘अल जबेरिया’ ही इमारत कुवेतच्या जब्बार शाही कुटुंबाची आहे. तीन वर्षांपूर्वी या इमारतींची किंमत १०० कोटी रुपये होती. त्यात ३० कोटींचे सामान होते. यात सोन्याची भांडी, पेंटिंग, दुर्मिळ कलाकृती, दागिने व फर्निचरचा समावेश आहे. संजयने फसवणूक करून फ्लॅटवर कब्जा केल्याचा आरोप कुवेतच्या शाही कुटुंबाचे वकील फैझल इसा केला. ७००० वर्गफुटांचा हा फ्लॅट केवळ १६ हजार ६६६ रुपयांत भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगण्यात आले. पुनामियांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तो ५० हजार रु. भाड्याने घेतला आहे.
अक्षय खन्ना अभिनीत ‘गली-गली में शोर है’, धर्मेंद्र, सनी, बॉबी अभिनीत ‘यमला-पगला-दिवाना’ हे चित्रपट पुनामिया निर्मित आहेत. तत्कालीन पोलिस कमिशनरचे पुनामिया निकटवर्तीय आहेत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही. असे कुवेतच्या शाही कुटुंबाचे म्हणणे आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पुनामिया यांचे भागीदार श्यामसुंदर अग्रवाल यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. २००७ मध्ये त्यांनी तिरुपती बालाजी एंटरप्रायजेस नामक फर्म बनवली होती. नाशिकजवळ ६ एकर भूखंड घेऊन ४८ लाख गुंतवले होते. प्रत्येकी २० लाख दोघांनी दिले. पुनामियाने जमीन बळकावल्याचा अग्रवालचा आरोप आहे. कागदपत्रांत त्याने गडबड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुनामियाने सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.