आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांवर नाराज!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे अधिकार देत नसल्याचे कारण पुढे करत थेट याअाधी ‘माताेश्री’कडे नाराजी व्यक्त करून राजीनामा देण्याचा इशारा देणारे शिवसेनेचे नेते व महसूल राज्यमंत्री संजय राठाेड अाता मुख्यमंत्र्यांवर नाराज झाले अाहेत. महसूल विभागातील बदल्यांचे अधिकार फडणवीस यांनी विभागीय आयुक्तांना दिल्याने राठोड संतापले अाहेत. महसूलप्रमाणेच गृह, बांधकाम, परिवहन, कृषी, ग्रामविकास तसेच सहकार अादी ‘मलईदार’ खात्यांच्या बदलीचे अधिकार मंत्रालयात ठेवता कामा नये, अशी आपण भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खडसे महसूल मंत्रिपदी असेपर्यंत बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांकडे साेपवण्यात अाले नव्हते. मात्र त्यांनी राजीनामा देताच फडणवीसांनी उघड भूमिका घेत बदल्यांमध्ये पारदर्शकपणा आणण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनी खडसेंच्या कार्यकाळात केलेल्या बदल्यांनाही स्थगिती दिली होती. आता उपजिल्हाधिकारी, तहसीलदारपासून महसूल इतर सर्व बदल्या विभागीय आयुक्तांमार्फत होतील, असे जाहीर करून यापुढे महसूलमध्ये अनियमितपणाला काही वाव राहणार नाही, याची काळजी फडणवीसांनी घेतली आहे.

‘अनेक मंत्री बदल्यांमध्ये गंुतले असल्याचे फडणवीस यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा निर्णय कदाचित घेतला असावा. पण त्यांचा हेतू चांगला असेल तर त्यांनी फक्त महसूलपर्यंत न थांबता इतर खात्यांच्या बदलींचे अधिकारही मंत्रालयात ठेवू नये. आमदारही मग मंत्रालयाकडे फिरकणार नाहीत. सर्वच िनयमाप्रमाणे होईल’, असा टाेला राठोड यांनी लगावला.

‘सर्वच खात्यांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे’
या निर्णयामुळे आता खरोखरच गरजेच्या बदल्यांसाठीही लोकप्रतिनिधींना विभागीय आयुक्तांना विनंती करावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना पारदर्शक कारभार करायचा असेल तर फक्त महसूल विभागात करू नये. इतर खात्यांवरही लक्ष द्यावे. आमचीही तशी आता मागणी राहणार आहे, अशी मागणीही राज्यमंत्री संजय राठाेड यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...