आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त व्यंगचित्रप्रकरणी उद्धव ठाकरेंपाठाेपाठ संजय राऊतांची दिलगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकातील वादग्रस्त व्यंगचित्रप्रकरणी दैनिकाचे संपादक व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर माफी मागितली. त्या पाठाेपाठ कार्यकारी संपादक व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रविवारी एक पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली. या व्यंगचित्रामुळे भावना दुखावलेला मराठा समाज व खास करून माता- भगिनींचा अपमान झाला असेल तर मी स्वत: दिलगिरी व्यक्त करून या वादावर पडदा टाकत असल्याचे राऊत यांनी म्हटले अाहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली त्या वेळी राज्याबाहेर असल्यामुळे अापण या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हताे, असे स्पष्टीकरण देण्यासही राऊत विसरले नाहीत.

या व्यंगचित्रातून जाणूनबुजून काेणाचाही अपमान करण्याचा, भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. ताे निव्वळ एक अपघात हाेता, असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले. ‘सामना’ छापून येणारे अग्रलेख ही शिवसेनेची अधिकृत भूमिका असते. मात्र इतरांनी केलेले लिखाण किंवा व्यंगचित्रे ही शिवसेनेची भूमिका कधीच नसते, असेही त्यांनी पत्रकात स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...