आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.....तर वाढीव जागासाठी मतदारसंघ वाढवावे लागतील - संजय राऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीत घटक पक्ष वाढल्याने त्यांना जागा द्यावयाच्या आहेत. असे असताना भाजपला जास्त जागा कशा देता येतील? भाजपला जास्त जागा द्यायच्या असतील तर विधानसभेच्या २८८ जागांमध्ये वाढ करून ३०० कराव्या लागतील. त्यानंतरच भाजपला १२ जागा वाढवून देता येतील, असा खोचक टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. जागावाटपाच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसारच जागावाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ज्या वेळी शिवसेना-भाजपची युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी एकत्र बसून जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला. त्यानुसार विधानसभेसाठी शिवसेनेला जास्त आणि लोकसभेसाठी भाजपला जास्त जागा दिल्या जातात. म्हणजेच विधानसभेत मोठा भाऊ आणि लोकसभेत भाजप मोठा भाऊ आहे. त्यानुसार या निवडणुकीतही शिवसेना १५० पेक्षा जास्त जागा लढवणारच. महायुतीत घटक पक्ष आल्याने त्यांना जागा सोडून उरलेल्या जागा शिवसेना-भाजपमध्ये वाटल्या जाणार आहेत. त्यामध्ये शिवसेना जास्तच जागा लढवणार हे नक्की. शिवसेना-भाजप आणि घटक पक्षांच्या मदतीने एक उत्तम सरकार राज्यात येईल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असेही ते म्हणाले. मागील निवडणुकीत शिवसेनेने १६९ आणि भाजपाने ११९ जागा लढविल्या होत्या, असेही ते म्हणाले.

त्यावेळी केवळ दोन पक्ष होते पण आता सहा पक्षांची महायुती असल्याने घटक पक्षांना समान जागा सोडण्याची तयारी असल्याचेही राऊत यांनी सांगितले.