आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या मागे लागून कर्जमाफी मंजूर करुन घेतली; संजय राऊत यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे 18 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात येत असतानाच ही कर्जमाफी शिवसेनेमुळेच झाल्याचा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
उर्वरित शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत पैसे
कर्जमाफीचे सर्व निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 18 ऑक्टोबरपासून त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. तर उर्वरित शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत पैसे दिले जाणार आहेत. पण ही कर्जमाफी आम्ही सरकारच्या मागे लागून मंजूर करुन घेतली, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
 
ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी चाचपडतोय
याबाबत संजय राऊत म्हणाले की, “कर्जमाफीवर शेतकरी समाधानी झाला, तर शेतकरी स्वत:हून सरकारचे अभिनंदन करेल. पण कर्जमाफीसाठी आम्ही आंदोलन करुन, सरकारला हा निर्णय घ्यायला लावला,” असा दावा यावेळी केला. शिवाय, कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी चाचपडतो आहे. या पिळवणुकीवर शेतकरी खुश नाही. त्यामुळे सरकारने दिवाळीपर्यंतचे जे वचन दिले आहे. त्याकडे आमचे लक्ष असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...