आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशक म्हणाले होते - निवडणूक झाल्यावर पुस्तक कसे खपणार : बारू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई (डीएनएवरून साभार) - पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारू हे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत आणलेल्या आपल्या ‘द अँक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. पुस्तकाच्या जोरदार विक्रीमुळे प्रकाशक मात्र जाम खुश आहेत. संजय बारूंशी साधलेला संवाद..

प्रश्न : पुस्तकामुळे एवढा वाद उद्भवेल, असे वाटले होते का?
उत्तर : इतका प्रतिसाद मिळण्याचा अंदाज नव्हता. मात्र शुक्रवारी पंतप्रधान कार्यालयानेच प्रतिक्रिया दिल्यानंतर मी चकित झालो. पीएमओचे वक्तव्य अपरिपक्व होते. तथापि, प्रकाशकाने पीएमओचे आभारच मानले आहेत.
प्रश्न : मात्र पुस्तकाच्या टायमिंगवरचे प्रश्नचिन्ह साहजिकच आहे..?
उत्तर : मी याबाबत प्रकाशकासोबत बोललो होतो. मात्र निवडणुकीनंतर हे पुस्तक कोण विकत घेईल, असा त्यांचा सवाल होता.
प्रश्न : पुस्तक लिहिल्यानंतर पीएमची भेट घेतली होती?
उत्तर : आम्ही भेटत नसतो. मात्र पीएमओ सोडल्यानंतरही मी पंतप्रधानांची भाषणे लिहिलेली आहेत. मागील पत्रकार परिषदेतील भाषणही मीच लिहिले होते.
प्रश्न : मग तुम्ही पुस्तकाबद्दल त्यांना सांगितले नाही?
उत्तर : याबाबत 30 डिसेंबरला मी त्यांना सांगितले. माझ्याकडूनच त्यांना याची माहिती कळावी, अशी माझी इच्छा होती.
प्रश्न : ते काय म्हणाले?
उत्तर : काहीच नाही. आठवडाभराआधीच मी एक प्रत त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती.
प्रश्न : तुमचे पुस्तक भाजपसाठी मात्र काँग्रेसवर वार करण्याचे हत्यार ठरले आहे. याची खंत वाटते का?
उत्तर : ते भाजप-काँग्रेसमधील द्वंद्व आहे. काँग्रेसने तर माझ्यावर हल्लाबोल केला. पुस्तकावर मोदींनी पैसा लावल्याचा आरोप माझे मित्र दिग्विजय सिंह यांनी केला. त्यांना जेव्हाकेव्हा मनमोहनसिंग यांना भेटायचे असे, मी भेट घडवून आणायचो.
प्रश्न : अशात पंतप्रधानांसोबत बोलणे झाले?
उत्तर : नाही. मात्र मी आधीच सांगितलेले होते, तुम्ही पुस्तक वाचल्यांनतर तुमच्याशी बोलायला आवडेल.
प्रश्न : 2009 मध्ये मनमोहनसिंग यांचा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घोडचूक असल्याचे तुम्ही का म्हणाला होतात?
उत्तर : त्यांनी लोकसभा लढवायलाच हवी होती. 2009 मध्ये ते अमृतसर व आसाम या दोन्ही ठिकाणांहून जिंकलेही असते. मला वाटते की, यूपीए-2 कार्यकाळात झालेल्या सर्व मोठय़ा घोडचूकांसाठी मनमोहनसिंग यांचे राज्यसभेतच राहणे जबाबदार आहे.