आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वच्छता अभियानातून संत गाडगेबाबांचे नाव कट, राष्ट्रवादी संतप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | राज्य सरकारने स्वच्छता अभियानासाठी अभिनेता आमिर खान याची ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करून संत गाडगेबाबांचे नाव वगळल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी केला.
तटकरे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर या माेहिमेची राष्ट्रीय पातळीवर सुरुवात करण्यात आली. मात्र, फडणवीस सरकारने संत गाडगेबाबांचे नाव वगळून आमिर खानला स्वच्छता अभियानाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. त्यामुळे सरकार किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, हे यातून दिसून येते. या कृत्याने सरकारने संत गाडगेबाबांचा अपमान केला आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
बातम्या आणखी आहेत...